नौदलात देशसेवा करायची मोठी संधी; प्रथमच होतेय प्रवेश परीक्षा... कसं कराल अ‍ॅप्लाय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 12:54 PM2019-05-15T12:54:49+5:302019-05-15T12:55:54+5:30

नौदलात थेट अधिकारी होण्याची संधी

Indian Navy to conduct first entrance test for selection of officers in September | नौदलात देशसेवा करायची मोठी संधी; प्रथमच होतेय प्रवेश परीक्षा... कसं कराल अ‍ॅप्लाय?

नौदलात देशसेवा करायची मोठी संधी; प्रथमच होतेय प्रवेश परीक्षा... कसं कराल अ‍ॅप्लाय?

नवी दिल्ली: अनेकांना सैन्यात जायचं असतं, पण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यानं हे स्वप्न अधुरचं राहतं. देशसेवा करण्याची संधी हुकली, याची खंत अनेकांच्या मनात असते. सैन्यात गेलो नाही, याची खंत मनात असलेल्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. नौदलाकडून अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी पहिल्यांदाच प्रवेश प्रक्रिया घेतली जाणार आहे. 

यंदाच्या सप्टेंबरमध्ये इंडियन नेव्ही एन्ट्रन्स टेस्ट (आयएनईटी) घेण्यात येणार आहे. ही परीक्षा कॉम्प्युटरवर आधारित असेल. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास थेट नौदलात अधिकारी होण्याची संधी मिळेल. या परीक्षेच्या माध्यमातून दोन प्रकारच्या (कायम आणि ठराविक कालावधीसाठी) सेवेतल्या अधिकाऱ्यांची भरती केली जाईल. सध्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डकडून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात. आता आयएनईटीकडून उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल. त्यातून गुणांच्या आधारे उमेदवार निवडले जातील. 

दर सहा महिन्यांनी परीक्षेसाठी सूचना प्रसिद्ध केली जाईल. भारतीय नौदलाच्या संकेतस्थळावर (joinindiannavy.gov.in) याबद्दलची माहिती उपलब्ध असेल. या माहितीच्या आधारे अर्ज करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या पात्रतेनुसार पर्याय निवडू शकतात. या परीक्षेसोबत यूपीएसईच्या माध्यमातून होणारी भरतीदेखील सुरूच असेल. यूपीएसई कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस एक्झामच्या (सीडीएस) माध्यमातून नौदलात अधिकाऱ्यांची भरती केली जाते. 

Web Title: Indian Navy to conduct first entrance test for selection of officers in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.