भारतीय हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर कोसळले, सात जवानांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 10:54 AM2017-10-06T10:54:59+5:302017-10-06T13:52:39+5:30

भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी मोहिमेवर असताना अरुणाचल प्रदेशमध्ये कोसळले.

Indian Air Force's MI-17 helicopter collapses, five deaths | भारतीय हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर कोसळले, सात जवानांचा मृत्यू

भारतीय हवाई दलाचे एमआय-17 हेलिकॉप्टर कोसळले, सात जवानांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे2013 सालच्या जून महिन्यात उत्तराखंडमध्ये एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला होता. भारत आणि रशियामध्ये झालेल्या करारानुसार मागच्यावर्षी रशियाने एमआय-17 व्ही 5 कॅटगरीतील तीन हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केली.

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर शुक्रवारी सकाळी अरुणाचल प्रदेशमध्ये तवांगजवळ कोसळले.  या दुर्घटनेत एअर फोर्सच्या सात जवानांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. एअर मेंटेनन्स मिशनवर असताना या हॅलिकॉप्टरला  सकाळी सहाच्या सुमारास अपघात झाला. भारतीय हवाई दलाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

यापूर्वी 2013 सालच्या जून महिन्यात उत्तराखंडमध्ये एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टरला मोठा अपघात झाला होता. उत्तराखंडमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बचाव मोहिमेवर असताना  एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत एअर फोर्सच्या 20 जवानांचा मृत्यू झाला होता. 

भारत आणि रशियामध्ये झालेल्या करारानुसार मागच्यावर्षी रशियाने एमआय-17 व्ही 5 कॅटगरीतील तीन हेलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केली. भारत सरकारने रशियाच्या रोस्टेक स्टेट कॉर्पोरेशन बरोबर एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला होता. एमआय-17 हेलिकॉप्टरचा प्रामुख्याने हवाई वाहतुकीसाठी वापर केला जातो. 

यावर्षी जुलै महिन्यात राजस्थानमधील जोधपूरमध्ये हवाई दलाचे MIG-23 लढाऊ विमान कोसळले होते. सुदैवाने या घटनेत विमानातील दोन्ही वैमानिक बचावले. या दुर्घटनेच्या दोन दिवसआधी म्हणजेच 4 जुलै रोजी अरुणाचल प्रदेशमधील पापूमपरे येथे बचावकार्यासाठी गेलेले हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. 

अरुणाचल प्रदेशमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात....
4 जुलै रोजी अरुणाचल प्रदेशमधील पापूमपरे येथे बचावकार्यासाठी गेलेले हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. अरुणाचल प्रदेशच्या पापुमपरे भागामध्ये हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले. मंगळवारी पूरस्थिती असलेल्या परिसरामध्ये मदतकार्य करत असताना अरुणाचल प्रदेशमधील सगली गावाजवळ हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर रडारवरून गायब झाल्याची माहिती मिळाली होती. इटानगर ते नहरलगूनदरम्यान हेलिकॉप्टर अचानक रडारवरून गायब झाले होते. 

 MIG-23 विमानाची खासियत...
- भारतीय हवाई दलातील MIG-23 हे एक लढाऊ विमान असून सोवियत संघमधील मिकॉयन-गुरेविच डिझाईन ब्युरोद्वारा तयार करण्यात आले आहे. या विमानाची लांबी 17 मीटर इतकी आहे. तसेच, या विमानचा वापर प्रशिक्षण देण्यापासून ते युद्धासाठी करण्यात येतो.  



Web Title: Indian Air Force's MI-17 helicopter collapses, five deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.