नाद करायचा नाय... 'एअर स्ट्राईक' करणाऱ्या भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:49 PM2019-03-25T12:49:34+5:302019-03-25T12:50:08+5:30

युद्धभूमीपासून दुर्गम प्रदेशापर्यंत सहजपणे हालचाली करण्यासाठी आणि अवजड हत्यारांची ने आण करण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या चिनूक हेलिकॉप्टर्सची उपयुक्तता सर्वश्रुत आहे.

Indian Air Force to induct the first unit of four Chinook helicopters today | नाद करायचा नाय... 'एअर स्ट्राईक' करणाऱ्या भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ

नाद करायचा नाय... 'एअर स्ट्राईक' करणाऱ्या भारतीय वायुसेनेला चिनूक हेलिकॉप्टरचं बळ

googlenewsNext

 चंदिगड - युद्धभूमीपासून दुर्गम प्रदेशापर्यंत सहजपणे हालचाली करण्यासाठी आणि अवजड हत्यारांची ने आण करण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या चिनूक हेलिकॉप्टर्सची उपयुक्तता सर्वश्रुत आहे. दरम्यान, अशी ही शक्तिशाली चिनूक हेलिकॉप्टर्स आज भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. भारतीय हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत चंदिगड एअरबेसवर चार चिनूक हेलिकॉप्टर्सचे युनिट हवाई दलात दाखल करून घेण्याता आले. यावेळी चिनूक हेलकॉप्टर्सची मारक क्षमता देशासाठी मोठा ठेवा असून, आजचा दिवस हा भारती हवाई दलाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस आहे. असे हवाई दल प्रमुख धनोआ यांनी म्हटले आहे. 

 चिनूक हे महाकाय हेलिकॉप्टर सुमारे 9.6 टन वजनाचे सामाना वाहून नेऊ शकते. वजनदार साहित्य, बंदुका तसेच शस्त्रसज्ज वाहने या हेलिकॉप्टरमधून वाहून नेता येतात. दुर्गम पर्वतीय विभागातील मोहिमांमध्ये ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त ठरू शकतात. लष्करी हालचालींसोबतच आपत्तीच्या प्रसंगी मदत आणि बचाव कार्यामध्येही ही हेलिकॉप्टर्स उपयुक्त ठरू शकतात.  





सर्वप्रथम 1962 मध्ये चिनूक हेलिकॉप्टर वापरात आणले गेले होते. तेव्हापासून या हेलिकॉप्टर्सच्या तंत्रज्ञानात खूप बदल झालेला आहे. तसेच व्हिएतनाम युद्धापासून अफगाणिस्तान आणि इराक युद्धापर्यंत अमेरिकेने या हेलिकॉप्टरचा अमेरिकेने प्रभावी वापर केला होता.



  

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात चिनूक हेलिकॉप्टर दाखल झाल्याने हवाई दलाची क्षमता वाढणार आहे. तसेच दुर्गम मार्ग आणि सीमारेषेवर बांधकाम प्रकल्पांच्या निर्मितीमध्ये ही हेलिकॉप्टर्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. 





 

Web Title: Indian Air Force to induct the first unit of four Chinook helicopters today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.