दहशतवाद्यांविरोधातील अमेरिकेच्या कारवाईनं भारत खूश, सुषमांनी सुनावले पाकला खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 06:40 PM2018-09-06T18:40:02+5:302018-09-06T18:42:05+5:30

भारत आणि अमेरिकेदरम्यान गुरुवारी पहिली 2+2 द्विपक्षीय बैठक झाली.

India is happy with the action of US against terrorists | दहशतवाद्यांविरोधातील अमेरिकेच्या कारवाईनं भारत खूश, सुषमांनी सुनावले पाकला खडे बोल

दहशतवाद्यांविरोधातील अमेरिकेच्या कारवाईनं भारत खूश, सुषमांनी सुनावले पाकला खडे बोल

googlenewsNext

नवी दिल्ली- भारत आणि अमेरिकेदरम्यान गुरुवारी पहिली 2+2 द्विपक्षीय बैठक झाली. यादरम्यान दोन्ही देशांत संरक्षण, व्यापारसह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो, संरक्षण मंत्री जेम्स पॅटिस यांच्याशी बातचीत केली आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बैठकीदरम्यान Communications Compatibility and Security Agreement (COMCASA) करारावर स्वाक्ष-या केल्या आहेत. या करारांतर्गत भारताला अमेरिका अत्याधुनिक तंत्रज्ञान देणार आहे. त्यामुळे भारताला त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच दोन्ही देश आता नव्या हॉटलाइन नंबरनेही जोडले जाणार आहेत. विशेष म्हणजे ही हॉटलाइन चर्चा संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावरची असणार आहे.


भारत आणि अमेरिका दहशतवाद्याच्या विरोधात एकत्र
सुषमा स्वराज म्हणाल्या, दोन्ही देशांमध्ये भारताला Nuclear Suppliers Group (NSG) सहभागी करण्यासंदर्भातही चर्चा झाली आहे. तसेच अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधल्या नीतीचंही आम्ही समर्थन करतो. अमेरिकेकडून लष्कर ए तय्यबाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचं आम्ही स्वागत केलं आहे. या सर्व दहशतवादी संघटना पाकिस्तानातून काम करत आहेत. ज्या भारत आणि अमेरिकेला त्रासदायक ठरत आहेत. भारतानं या बैठकीत एच 1 व्हिसा मुद्दाही उपस्थित केला.
संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी पाक पुरस्कृत दहशतवादावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, भारत आणि अमेरिका दहशतवादाविरोधात एकत्र काम करणार आहेत. दोन्ही देश हॉटलाइननं जोडले जाणार आहेत. भारत आणि अमेरिकेदरम्यान पाकिस्तान आणि दहशतवादावर चर्चा झाली आहे.

 

Web Title: India is happy with the action of US against terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.