अपघात झाला, 14 सर्जरी, 1 वर्ष अंथरुणाला खिळून पण स्वप्न सोडलं नाही; झाली IAS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 01:39 PM2024-03-02T13:39:44+5:302024-03-02T13:48:25+5:30

आयएएस प्रीती बेनीवाल यांनी आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सर्व अडचणींवर मात केली.

ias preeti beniwal success story14 surgeries paralysed for 1 year cracked upsc without coaching | अपघात झाला, 14 सर्जरी, 1 वर्ष अंथरुणाला खिळून पण स्वप्न सोडलं नाही; झाली IAS अधिकारी

अपघात झाला, 14 सर्जरी, 1 वर्ष अंथरुणाला खिळून पण स्वप्न सोडलं नाही; झाली IAS अधिकारी

काही लोकांना आपल्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण ते यशस्वी होतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. आयएएस प्रीती बेनीवाल यांनी आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सर्व अडचणींवर मात केली. हरियाणातील दुपेडी येथील रहिवासी असलेल्या प्रीतीने जवळच्या फफडाना गावात एका खासगी शाळेत शिक्षण घेतलं. तिने दहावीत चांगले गुण मिळवून यश संपादन केलं. 

M.Tech पूर्ण केल्यानंतर प्रीतीने 2013 ते 2016 या कालावधीत बहादूरगड येथील ग्रामीण बँकेत क्लार्क म्हणून काम केलं. 2016 ते जानेवारी 2021 पर्यंत कर्नालमध्ये FCI चे असिस्टेंट जनरल II म्हणून काम केलं. त्यानंतर, जानेवारी 2021 मध्ये परराष्ट्र मंत्रालयात असिस्टेंट सेक्शन ऑफिसर म्हणून तिची निवड झाली. त्यानंतर ती दिल्लीच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करू लागली.

नोव्हेंबर 2016 मध्ये प्रितीला एफसीआयमध्ये प्रमोशनसाठी गाझियाबादमध्ये परीक्षा द्यावी लागणार होती. मात्र गाझियाबाद रेल्वे स्थानकावर ती रेल्वे अपघाताला बळी पडली. ती ट्रेनसमोर पडली. यानंतर तिला दुखापत झाली. तिला 14 सर्जरी कराव्या लागल्या आणि एक वर्षाहून अधिक काळ त्याला अंथरुणाला खिळून राहावे लागले.

लग्न मोडलं. आयएएस अधिकारी होण्याचं प्रीतीचं बालपणीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती समर्पित होती म्हणून तिने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. कोचिंगशिवाय दोन प्रयत्नांनंतर, तिने शेवटी 2020 मध्ये 754 रँकसह यश मिळविलं.

तरुणांसाठी प्रेरणादायी मेसेज केला आहे. "कोणत्याही परीक्षेपेक्षा जीवन महत्त्वाचे आहे. मुले परीक्षेत नापास झाल्यावर आत्महत्येबद्दल बोलतात. मला आश्चर्य वाटते की कोणत्याही परीक्षेचा एखाद्याच्या जीवनावर इतका परिणाम कसा होतो. मला एवढेच सांगायचे आहे की हे फक्त एक चाचणी आहे. कोणीही कोणापेक्षा कमी किंवा जास्त नाही. सर्वोत्तम द्या, शांत रहा आणि कशाचीही भीती बाळगू नका" असं म्हटलं आहे. 
 

Web Title: ias preeti beniwal success story14 surgeries paralysed for 1 year cracked upsc without coaching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.