मला आधीच खूप मिळालंय, पंतप्रधानपदाची लालसा नाही- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 01:03 PM2019-02-02T13:03:58+5:302019-02-02T13:05:20+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं.

I do not have the post of Prime Minister - Nitin Gadkari | मला आधीच खूप मिळालंय, पंतप्रधानपदाची लालसा नाही- नितीन गडकरी

मला आधीच खूप मिळालंय, पंतप्रधानपदाची लालसा नाही- नितीन गडकरी

ठळक मुद्देनितीन गडकरींनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानपदाची लालसा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. मी माझं काम करतो. मी माझं जीवन माझ्या पद्धतीनं जगतो. मी कोणाच्याही इशाऱ्यांनी बोलत नाही.

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. परंतु नितीन गडकरींनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानपदाची लालसा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. मी माझं काम करतो. माझ्या कुवतीपेक्षा मला भरपूर काही मिळालं आहे. मी माझं जीवन माझ्या पद्धतीनं जगतो. मी कोणाच्याही इशाऱ्यांनी बोलत नाही. तसेच यावेळी त्यांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. गंगेचं प्रदूषण कमी झालं असून, गरिबांच्या घराघरात वीज पोहोचल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला आहे.

ते म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू हे एक चांगले लेखक होते. मी त्यांची पुस्तकं वाचली आहेत. त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यांच्या विकासाचं मॉडल वेगळ होतं. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींचीही स्तुती केली आहे. त्या अनेक पुरुष नेत्यांहूनही सक्षम होत्या, असंही गडकरी म्हणाले आहेत.

त्यांच्याकडून भाजपा नेतृत्वावर होत असलेल्या टीकेवरही त्यांनी उत्तर दिलं. माझ्या विधानांची मोडतोड करून ती दाखवली जातात. मी जे बोललोच नाही, ते कोट करून दाखवले जाते. मागील काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते. स्वप्न दाखवणारे नेते जनतेला आवडतात. परंतु ती स्वप्नं पूर्ण न केल्यास जनतेचा मार खावा लागतो. त्यानंतर विरोधकांनी गडकरींनी मोदींना इशारा दिल्याची दवंडी पिटली होती. 

Web Title: I do not have the post of Prime Minister - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.