हैदराबाद बॉम्बस्फोट : दोन आरोपींना फाशी, एकास जन्मठेप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 09:57 PM2018-09-10T21:57:07+5:302018-09-10T21:57:28+5:30

11 वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोन दोषी आरोपींना फाशी तर एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Hyderabad blasts: Death sentence of two accused, one man life imprisonment | हैदराबाद बॉम्बस्फोट : दोन आरोपींना फाशी, एकास जन्मठेप 

हैदराबाद बॉम्बस्फोट : दोन आरोपींना फाशी, एकास जन्मठेप 

Next

हैदराबाद -  11 वर्षांपूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने दोन दोषी आरोपींना फाशी तर एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने अनिक शफीक सईद आणि इस्माइल चौधरी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर तारिक अंजूम याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 




फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या अनिक याने लुंबिनी पार्कमध्ये बॉम्ब ठेवल्याचा आरोप होता. त्यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाला होता. तर अकबर याने दिलसुखनगरमध्ये बॉम्ब ठेवला होता. मात्र त्याचा स्फोट झाला नव्हता. न्यायालयाने चार सप्टेंबर रोजी या आरोपींना दोषी ठरवले होते. तर तारिक अंजूम याला या आरोपींना आश्रय दिल्याच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवण्यात आले.  

Web Title: Hyderabad blasts: Death sentence of two accused, one man life imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.