महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्याचा बदला, हिंदू महासभेची वेबसाइट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 06:00 PM2019-01-31T18:00:09+5:302019-01-31T18:13:00+5:30

हिंदुत्ववादी संघटना अखिल भारतीय हिंदू महासभेची अधिकृत वेबसाइट गुरुवारी (31 जानेवारी) हॅक करण्यात आली.

Hindu Mahasabha’s website hacked in response to shooting Mahatma effigy | महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्याचा बदला, हिंदू महासभेची वेबसाइट हॅक

महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्याचा बदला, हिंदू महासभेची वेबसाइट हॅक

Next
ठळक मुद्देअखिल भारतीय हिंदू महासभेची अधिकृत वेबसाइट हॅकमहात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या;संबंधितांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा - हॅकर्स'हिंदू महासभा मुर्दाबाद' - हॅकर्स

नवी दिल्ली - हिंदुत्ववादी संघटना अखिल भारतीय हिंदू महासभेची अधिकृत वेबसाइट गुरुवारी (31 जानेवारी) हॅक करण्यात आली. बुधवारी (30 जानेवारी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी या संघटनेकडून महात्मा गांधींच्या हत्येची घटना पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला गेला. या संतापजनक घटनेनंतर केरला सायबर वॉरिअर्सनं अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाइटच हॅक केली.
वेबसाइटच्या संकेतस्थळाला http://www.abhm.org.in/ भेट दिल्यास, त्यावरील होम पेजवर हॅकिंग टीमच्या मागण्या दिसत आहेत. 

महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी हॅकिंग टीमने केली आहे. सोबतच वेबसाइटवर 'हिंदू महासभा मुर्दाबाद' असेही लिहिले आहे.  

नेमका काय आहे प्रकार?
बुधवारी (30 जानेवारी) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 71 व्या पुण्यतिथी दिनी हिंदू महासभेच्या नेत्या पूजा पांडेय यांनी गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या. तसेच त्यांच्या प्रतिमेचे दहनही केले.  यावेळी नथुराम गोडसेच्या छायाचित्रावर पुष्पहार अर्पण करत मिठाईचे वापट करण्यात आले. 'महात्मा नथुराम गोडसे अमर रहे'च्या घोषणाही दिल्या गेल्या. उत्तर प्रदेशातील अलीगड येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. हिंदू महासभेने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी शौर्य दिवस साजरा केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  
'महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणणे अयोग्य आहे. जर मी नथुराम गोडसेच्या आधी जन्मले असते, तर मीच महात्मा गांधी यांची हत्या केली असती.'असे संतापजनक वक्तव्यही पूजा  शकून पांडेय हिने केले. दरम्यान, या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच विविध विचारवंतांसह, सर्वसामान्यांकडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  याप्रकरणी अलिगड पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. शिवाय, पूजा पांडेयसहीत 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 



 

अखिल भारतीय हिंदू महासभेची वेबसाइट हॅक
या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी  केरला साइबर वॉरिअर्सच्या टीमनं हिंदू महासभेची वेबसाइट हॅक केली. लोकांना महात्मा गांधींकडून अहिंसा आणि योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली, असा मजकूर हॅकिंग टीमकडून वेबसाइटवर लिहिण्यात आला आहे. दरम्यान, हिंदू महासभेची वेबसाइट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. 

केरळमधील पूरपरिस्थितीवर प्रतिक्रिया देताना हिंदू महासभेचे प्रमुख स्वामी चक्रपाणि यांनी म्हटले होते की, 'जी लोक बीफ खात नाहीत, त्यांनाच मदत केली पाहिजे'. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी हॅकर्सनं हिंदू महासभेची वेबसाइट हॅक केली होती.

Web Title: Hindu Mahasabha’s website hacked in response to shooting Mahatma effigy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.