तुमकुरच्या जागेवरून काँग्रेस-जेडीएसमध्ये जुंपली; देवेगौडांविरोधात खासदाराचे बंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 05:42 PM2019-03-23T17:42:08+5:302019-03-23T17:53:30+5:30

28 लोकसभा मतदारसंघ असलेल्या कर्नाटकमध्ये 20 जागा काँग्रेस आणि 8 जागा जेडीएस लढणार आहे.

HD Devegowda will contest from the Tumkur but congress MP Object | तुमकुरच्या जागेवरून काँग्रेस-जेडीएसमध्ये जुंपली; देवेगौडांविरोधात खासदाराचे बंड

तुमकुरच्या जागेवरून काँग्रेस-जेडीएसमध्ये जुंपली; देवेगौडांविरोधात खासदाराचे बंड

googlenewsNext

तुमकुर : कर्नाटकमध्ये जेडीएस, काँग्रेसमध्ये महाआघाडी झाली असून जेडीएसने तुमकुर मतदारसंघातून माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा लढणार असल्याची घोषणा केल्याने या जागेवरील काँग्रेसचे विद्यमान खासदार नाराज झाले आहेत. आघाडी म्हणजे काय? सहकार्य काय असते? माझे तिकिट कापून चुकीचे केल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. 


28 लोकसभा मतदारसंघ असलेल्या कर्नाटकमध्ये 20 जागा काँग्रेस आणि 8 जागा जेडीएस लढणार आहे. आधीच विधानसभेतील मंत्रीमंडळ विस्तारावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. तसेच सत्ता गमवावी लागल्याने काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना काम करू देत नसल्याचा आरोप होत आहे. यामुळे विद्यमान खासदाराचे तिकिट कापून माजी पंतप्रधान एच डी देवेगौडांना जागा देणे काँग्रेसला धोक्याचे आहे. 


तुमकूर मतदारसंघातून काँग्रेसचे मुद्दहनुमेगौडा खासदार आहेत. तर जेडीएसचे प्रवक्ते रमेश बाबू यांनी एच डी देवेगौडा तुमकुर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे मुद्दहनुमेगौडा नाराज झाले असून आघाडी म्हणजे काय? सहकार्य काय असते? मी तुमकुरचा विद्यमान खासदार आहे आणि मी चांगले योगदान दिले आहे. तरीही माझे तिकिट कसे कापले जाते? हे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 



 

तुमकुरुमधील सर्व स्थानिक पदाधिकारी, नेते यांची मी लढण्याची मागणी आहे. यामुळे सोमवारी रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे मुद्दहनुमेगौडा यांनी सांगितले. 




तर कांग्रेसचे नेते दिनेश गुंडूराव यांनी देवेगौडा यांनी उत्तर बेंगळूरू मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची मागणी केली आहे. येथे 5 काँग्रेस आणि देन जेडीएसचे आमदार आहेत. यामुळे या मतदारसंघातून देवेगौडांचा विजय सोपा असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

 



देवेगौडा हे 1996 मध्ये जनता दलाच्या पाठिंब्यावर पंतप्रधानपदी बसले होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ 7 महिनेच टिकला होता. त्यांचे वय 85 वर्षे आहे. गेल्या वर्षी कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवेगौडांचा पक्ष जेडीएस किंमगेकर ठरला होता. 

Web Title: HD Devegowda will contest from the Tumkur but congress MP Object

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.