'हे जग आम्हाला एकत्र येऊ देणार नाही', मुलीसह लेस्बियन कपलची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 10:45 AM2018-06-12T10:45:36+5:302018-06-12T10:45:36+5:30

एका पेपर डिशवर लाल लिपस्टिकने या दोघींनी आत्महत्येचं कारण सांगितलं.

Gujarat lesbian couple jumps to death in Sabarmati river with baby | 'हे जग आम्हाला एकत्र येऊ देणार नाही', मुलीसह लेस्बियन कपलची आत्महत्या

'हे जग आम्हाला एकत्र येऊ देणार नाही', मुलीसह लेस्बियन कपलची आत्महत्या

Next

अहमदाबाद- गुजरातमधील एका लेस्बियन कपलने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या जोडप्याने त्यांच्यातील एकीच्या तीन वर्षीच्या मुलीलाही नदीत फेकून दिलं. सोमवारी ही घटना घडली आहे. दरम्यान, फायर ब्रिगेडच्या पथकाने आशा ठाकोर (वय 30) व भावना ठाकोर (वय 28) यांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. आशाची मुलगी मेघाला नदीतून बाहेर काढले तेव्हा तिचा श्वास सुरू होता. पण हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 
आत्महत्येचं कारण या जोडप्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. ‘हे जग आम्हाला एकत्र येऊ देणार नाही. त्यामुळेच आम्ही आत्महत्या करत आहोत’, असं या महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
एका पेपर डिशवर लाल लिपस्टिकने या दोघींनी आत्महत्येचं कारण सांगितलं. 'हे जग आपल्याला एकत्र राहू देणार नाही. आपण पुन्हा कधी भेटणार? पुढील जन्मातच आपण भेटू शकतो. पुढच्या जन्मात भेटूया. असंही सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. 
सुत्रांच्या माहितीनुसार, आशा व भावना या अहमदाबाद जिल्ह्यातील राजोदा गावातील एका फॅक्टरीमध्ये नोकरी करत होत्या. दोघीही विवाहित असून दोघींची लग्नानंतर ओळख झाली. ओळख वाढल्यानंतर दोघींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.
दरम्यान, आशाचं दहा वर्षापूर्वी लग्न झालं असून तिला दोन मुली आहेत. भावनाचंही लग्न झालं असून तिला 14 व 13 वर्षीय अशी दोन मुलं आहेत. 
 

Web Title: Gujarat lesbian couple jumps to death in Sabarmati river with baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.