ठळक मुद्देओडिशामध्ये एका शाळेत काही विद्यार्थ्यांनी जबरदस्ती एका विद्यार्थिनीला कपडे काढण्यास भाग पाडले असल्याची घटनाविद्यार्थिनीचा व्हिडीओ काढून व्हायरल करण्यात आलापोलिसांनी दोन आरोपी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं असून, तिस-या विद्यार्थ्याचा शोध सुरु आहे

भुवनेश्वर - ओडिशामध्ये एका शाळेत काही विद्यार्थ्यांनी जबरदस्ती एका विद्यार्थिनीला कपडे काढण्यास भाग पाडले असल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे विद्यार्थिनीचा व्हिडीओ काढून व्हायरल करण्यात आला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा शिक्षकाने या विद्यार्थ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना यामध्ये न पडण्याची धमकी देण्यात आली. या घटनेत एकूण तीन विद्यार्थी सामील असल्याची माहिती आहे. या सर्व विद्यार्थ्यांकडे चाकू होता, ज्याचा धाक दाखवत हे कृत्य करण्यात आलं. विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि विद्यार्थिनीला चाकूने हल्ला कऱण्याची धमकीच दिली होती. 

ही घटना 7 नोव्हेंबरची आहे. मलकानगिरी येथील एका शाळेत ही घटना घडली असून व्हिडीओ तयार करण्यात आला होता. पोलिसांनी दोन आरोपी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं असून, तिस-या विद्यार्थ्याचा शोध सुरु आहे. 

पीडित विद्यार्थिनीने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, 'जेव्हा शिक्षकाने माझी मदत करण्यास नकार दिला तेव्हा आरोपी विद्यार्थ्यानी माझे फोटो काढले, व्हिडीओ तयार केले. त्यांना माझ्यावर लैंगिक अत्याचर केला'. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यांवर पॉस्को आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका विशेष पथकाकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

भारतामध्ये गेल्या काही काळापासून बलात्कार, छेडछाड, घरगुती हिंसाचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. राजधानी दिल्लीतील गुन्ह्यांची आकडेवारी पाहता जानेवारी 2016 ते डिसेंबर 2016 पर्यंत एकूण 16 हजार 944 गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, दरोडे, हत्या, हत्येचा प्रयत्न, लूट, दंगल आणि खंडणीसारख्या घटनांची आकडेवारी मात्र कमी झाली आहे. बलात्काराचे गुन्हेही गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता कमी झाल्याचं पहायला मिळत आहे.