आप आणि नायब राज्यपालांमधील वाद मोदींच्या दारात, चार मुख्यमंत्र्यांनी केले वाद मिटवण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2018 02:24 PM2018-06-17T14:24:14+5:302018-06-17T14:58:43+5:30

four Chief Minister appealed to modi | आप आणि नायब राज्यपालांमधील वाद मोदींच्या दारात, चार मुख्यमंत्र्यांनी केले वाद मिटवण्याचे आवाहन

आप आणि नायब राज्यपालांमधील वाद मोदींच्या दारात, चार मुख्यमंत्र्यांनी केले वाद मिटवण्याचे आवाहन

Next

नवी दिल्ली - दिल्लीमधील सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात सुरू झालेला वाद आता मोदींच्या दारात पोहोचला आहे. केजरीवाल यांनी राज्यपालांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर ममता बॅनर्जी, कुमारस्वामी, पिनराई विजयन आणि चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन हा वाद मिटवण्याचे आवाहन केले आहे. 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केजरीवाल यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. तसेच केजरीवाल यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र नायब राज्यपालांनी परवानगी नाकारल्याने संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडताना देशात सांवैधानिक संकट निर्माण झाल्याची टीका केली होती.  




आयएएस अधिकाऱ्यांच्या असहकारांच्या धोरणामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवटीसारखी परिस्थिती आहे, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल केला होता.  केजरीवाल यांनी तीन मंत्र्यांसह  नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन सुरू केले असून, आज या आंदोलनाचा सातवा दिवस आहे. आयएएस अधिका-यांना संप समाप्त करण्यास सांगा, अशी मागणी आपचे नेते नायब राज्यपालांकडे करत आहेत. दिल्ली सरकारमधील आयएएस अधिकारी मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजर राहत नाहीत आणि मंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकांनाही जात नाही. दरम्यान, आम्ही संप केलेला नाही, असा आयएएस अधिकाऱ्यांचा दावा आहे. आम्ही रोज कार्यालयात येतो. सरकारचा निषेध म्हणून पाच मिनिटे काम करीत नाही. नंतर मात्र नियमित काम करतो, असा त्यांचा दावा आहे.

Web Title: four Chief Minister appealed to modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.