‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ प्रकरणी माजी अधिकाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 05:19 AM2019-04-14T05:19:58+5:302019-04-14T05:20:03+5:30

आयएल अ‍ॅण्ड एफएस घोटाळ्यात गंभीर घोटाळा तपास कार्यालयाने (एसएफआयओ) शनिवारी आयएल अ‍ॅण्ड एफएस फायनान्शिअल सर्व्हिसेसचे माजी सीईओ रमेश सी. बावा यांना अटक केली.

Former officer arrested on 'IL & FS' case | ‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ प्रकरणी माजी अधिकाऱ्यास अटक

‘आयएल अ‍ॅण्ड एफएस’ प्रकरणी माजी अधिकाऱ्यास अटक

Next

नवी दिल्ली : आयएल अ‍ॅण्ड एफएस घोटाळ्यात गंभीर घोटाळा तपास कार्यालयाने (एसएफआयओ) शनिवारी आयएल अ‍ॅण्ड एफएस फायनान्शिअल सर्व्हिसेसचे माजी सीईओ रमेश सी. बावा यांना अटक केली. या घोटाळ्यात अटक झालेल्या अधिकाऱ्यांची संख्या आता दोन झाली आहे.
बावा यांनी कंपनीच्या सीईओपदाबरोबरच व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभारही सांभाळलेला होता. पदाचा गैरवापर करून फसवणूक केल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. पात्र नसलेल्या अनेक कंपन्यांना त्यांनी कर्जे दिली. त्यामुळे कंपनीला, तसेच तिच्या कर्जदात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. या महिन्यात आयएल अ‍ॅण्ड एफएसचे माजी उपाध्यक्ष हरी शंकरन यांना अटक करण्यात आली. आयएल अ‍ॅण्ड एफएस फायनान्शिअल सर्व्हिसेसवर १७,५०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. ऋण साधने आणि बँका यांच्याकडून हे कर्ज घेण्यात आले आहे. कंपनीच्या ऋण साधनांत विविध प्राव्हिडंट फंडस्, पेन्शन फंड, ग्रॅच्युइटी फंडस् आणि बँका यांनी गुंतवणूक केलेली आहे.

Web Title: Former officer arrested on 'IL & FS' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.