फ्लिपकार्टवर पुन्हा मिळणार रिफंड !

By admin | Published: April 26, 2017 01:02 PM2017-04-26T13:02:25+5:302017-04-26T13:03:06+5:30

ग्राहकांची संख्या घटण्याच्या भीतीपायी फ्लिपकार्टला ती पॉलिसी मागे घ्यावी लागली आहे.

Flipkart will get refunds again! | फ्लिपकार्टवर पुन्हा मिळणार रिफंड !

फ्लिपकार्टवर पुन्हा मिळणार रिफंड !

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - ई- कॉमर्समध्ये आघाडीची कंपनी असलेल्या फ्लिपकार्टनं गेल्या काही दिवसांपूर्वी नो रिफंड पॉलिसी बाजारात आणली होती. मात्र ग्राहकांची संख्या घटण्याच्या भीतीपायी फ्लिपकार्टला ती पॉलिसी मागे घ्यावी लागली आहे. ऑनलाइन बाजारातून ग्राहक प्लिपकार्टपासून दूर जाण्याच्या चिंतेमुळे फ्लिपकार्टनं ही पॉलिसी नव्या पद्धतीनं पुन्हा ग्राहकांसाठी सेवेत आणली आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने शॉपिंग करणा-या ग्राहकांना वस्तू परत केल्यास आता रिफंडच्या स्वरूपात पैसे मिळणार आहे. बुक्स, होम डेकोर आणि लाइफस्टाइल, फॅशन प्रॉडक्शन, फिटनेस इक्विपमेंट, म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स आणि इतर वस्तूंवर फ्लिपकार्टचे ग्राहक आता रिफंड मिळवू शकतात.

देशातली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टनं गेल्या काही दिवसांपूर्वी स्वतःच्या ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तूवर रिफंड देणं बंद केलं होतं. तसेच कंपनी अद्यापही मोबाइल फोन, फर्निचर, एअर कंडिशनर, वॉशिंग मशिन, टेलिव्हिजन सारख्या उत्पादनांवर रिफंड देत नाही. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, 1 वर्षाच्या दरम्यान रिटर्न पॉलिसीत कोणताही बदल झाला नाही. फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर गेल्या आठवड्यात पॉलिसीला अपडेट करण्यात आलं होतं आणि यात "नो रिफंड ऑफर्ड, ऑल सेल्स आणि फायनल" याचा उल्लेख नव्हता. फ्लिपकार्टची रिटर्न पॉलिसी ग्राहकांसाठी फायदेशीर आहे. एक वर्षांमध्ये यात कोणताही बदल झाला नाही. आमच्या ग्राहकांनी फ्लिपकार्टवर कोणत्याही अडथळ्याविना रिटर्न एक्सपीरियन्सचा मजा घेतली आहे. फ्लिपकार्टवरच्या 1800 सेक्शनमधील दोन तृतीयांश सेक्शनसाठी रिफंडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पॉलिसीनुसार, कपडे, फूटवेअर, आयवेअर आणि फॅशनच्या उपकरणांसारख्या निवडक प्रॉडक्ट बदलण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिला जातो. या दिलेल्या मुदतीत बदलता येऊ शकते. आता या प्रोडक्टसाठी अवधीमध्ये रिफंडचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र एवढ्या लवकर पॉलिसीमध्ये बदल केल्यामुळे ब-याचदा ग्राहक संभ्रमात पडतो. ग्राहक ब-याचदा ई-कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी करतात. त्यामुळे कोणत्या वस्तूला ही सुविधा लागू अथवा नाही, हे ग्राहकाला समजून घेण्याचा अधिकार आहे. वारंवार पॉलिसीमध्ये बदल केल्यामुळे ग्राहकांचा विश्वासही उडत चालला आहे, असंही कंपनीचे कंसल्टिंग चीप एग्झिक्युटिव्ही देवांग्शु दत्ता म्हणाले आहेत.

Web Title: Flipkart will get refunds again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.