बंगळुरूत साकारणार पहिलं 'आधार प्रणालीयुक्त विमानतळ', प्रवाशांची फक्त 10 मिनिटांत होणार पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 04:23 PM2017-10-09T16:23:24+5:302017-10-09T16:40:02+5:30

कर्नाटकात लवकरच आधार प्रणालीयुक्त विमानतळ प्रत्यक्षात अवतरणार आहे. आता तुम्हाला विमानतळावर जागोजागी आयडी कार्ड ऐवजी फक्त मशिनच्या समोर हात दाखवावा लागणार आहे.

The first 'Aadhaar system based airport' to be set up in Bangalore, will be done in 10 minutes. | बंगळुरूत साकारणार पहिलं 'आधार प्रणालीयुक्त विमानतळ', प्रवाशांची फक्त 10 मिनिटांत होणार पडताळणी

बंगळुरूत साकारणार पहिलं 'आधार प्रणालीयुक्त विमानतळ', प्रवाशांची फक्त 10 मिनिटांत होणार पडताळणी

Next
ठळक मुद्देकर्नाटकात लवकरच आधार प्रणालीयुक्त विमानतळ प्रत्यक्षात अवतरणार आहे. आता तुम्हाला विमानतळावर जागोजागी आयडी कार्ड ऐवजी फक्त मशिनच्या समोर हात दाखवावा लागणार आहे. अथक प्रयत्नानंतर मार्च 2018मध्ये बंगळुरूतल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातली पहिली आधार प्रवेश व बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीम अस्तित्वात येणार आहे.

बंगळुरू - कर्नाटकात लवकरच आधार प्रणालीयुक्त विमानतळ प्रत्यक्षात अवतरणार आहे. आता तुम्हाला विमानतळावर जागोजागी आयडी कार्ड ऐवजी फक्त मशिनच्या समोर हात दाखवावा लागणार आहे. अथक प्रयत्नानंतर मार्च 2018मध्ये बंगळुरूतल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातली पहिली आधार प्रवेश व बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीम अस्तित्वात येणार आहे.

या विमानतळामुळे प्रवाशांची जागोजागी चेकपॉइंटवर आयडी व बोर्डिंग पास दाखवण्याची कटकट संपणार आहे. तसेच प्रवाशांचा वेळसुद्धा वाचणार आहे. खरं तर विमानतळांची सुरक्षा वाढवण्यासह प्रवाशांचा प्रवेश सुकर होण्यासाठी आता आधार बेस प्रवेशाला चालना देण्यात येत आहे. बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीमनं तयार झालेलं बंगळुरूतील केआयए विमानतळ हे देशातील पहिलं आधार बेसद्वारे प्रवेश देणारं विमानतळ असणार आहे. सध्या इथे पायलट प्रोजेक्टही सुरू आहे.

बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड(बीआयएएल)द्वारे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, मार्च 2018पर्यंत विमानतळावरील प्रवेशावर आधार व बायोमेट्रिक सिस्टीम लागू करण्यात येणार आहे. डिसेंबर 2018पर्यंत विमानतळ पूर्णतः आधार सिस्टीमनं युक्त करण्यात येणार आहे. बीआयएएलनुसार, विमानतळावर जागोजागी चेकपॉइंटवर प्रवाशांचा जवळपास 25 मिनिटांचा वेळ खर्ची पडतो. मात्र आधार आधारित प्रणालीमुळे ही सर्व प्रक्रिया केवळ 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे बोर्डिंग गेटच्या आधी प्रत्येक चेकपॉइंटवर फक्त पाच सेकंदच पडताळणी होणार आहे. तसेच ही प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर सर्वाधिक प्रवासी एकाच गेटमधून प्रवेश घेऊ शकणार आहेत.

या प्रक्रियेमुळे पडताळणी करणंही सोपं जाणार आहे. तसेच सुरक्षेतही पारदर्शकता येणार आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून पडताळणी करून प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर केला जाणार आहे, अशी माहिती बीआयएएलचे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष हरी मरार यांनी दिली आहे. तसेच या बायोमेट्रिक प्रणालीमुळे प्रवासी संख्येतही वाढ होणार आहे. बीआयएएलनं ही नवी प्रणाली बसवण्यासाठी 325 दिवसांची मुदत निश्चित केली आहे. मार्च 2018पर्यंत विमानतळांवर आधार आधारित प्रवेश सुरू करण्यात येणार आहे. 

Web Title: The first 'Aadhaar system based airport' to be set up in Bangalore, will be done in 10 minutes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.