बिहारमध्ये पुन्हा मॉब लिंचिंग; तरुणाच्या हत्येप्रकरणी 150 जणांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 11:47 AM2018-09-11T11:47:11+5:302018-09-11T11:49:59+5:30

आजीच्या वर्षश्राद्धाचं सामान आणण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या

FIR against 150 people in Bihar Sitamarhi lynching case | बिहारमध्ये पुन्हा मॉब लिंचिंग; तरुणाच्या हत्येप्रकरणी 150 जणांविरोधात गुन्हा

बिहारमध्ये पुन्हा मॉब लिंचिंग; तरुणाच्या हत्येप्रकरणी 150 जणांविरोधात गुन्हा

Next

पाटणा: बिहारमध्ये पुन्हा एकदा मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 150 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीतामढी जिल्ह्यातील एक तरुण आजीच्या वर्षश्राद्धासाठी सामान आणायला जात होता. त्यावेळी जमावानं त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

सीतामढीमधील सिगंहरिया गावचा रहिवासी रुपेश झा त्याच्या आजीच्या वर्षश्राद्धाचं सामान आणण्यासाठी निघाला होता. त्यावेळी त्याच्यासोबत एक मित्रदेखील होता. सामान आणायला जात असताना पिक-अपच्या चालकासोबत त्याचा वाद झाला. यानंतर त्याठिकाणी मोठी गर्दी जमली. जमावानं कोणताही विचार न करता रुपेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. अनेकांनी रुपेशला काठ्यांनी जबर मारहाण केली. रुपेशनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावानं मारहाण सुरूच ठेवली. 

काही वेळानं स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी रुपेश गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुपेशची प्रकृती गंभीर असल्यानं कुटुंबीयांनी त्याला शहरातील प्रसिद्ध डॉक्टर वरुण कुमार यांच्या क्लिनिकमध्ये नेलं. मात्र रुपेशची प्रकृती अतिशय नाजूक असल्यानं वरुण कुमार यांनी त्याला पीएमसीएचमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र रात्री 11 वाजता त्याचा मृत्यू झाला. 
 

Web Title: FIR against 150 people in Bihar Sitamarhi lynching case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.