फिल्ममेकर्सच्या घरातील स्त्रिया रोज नवरे बदलतात त्यांना जौहरचा अर्थ काय समजणार ? - भाजपा खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 12:57 PM2017-11-08T12:57:28+5:302017-11-08T13:01:56+5:30

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटाला होणारा विरोध दिवसेंदिवस चालला वाढत आहे. येत्या 1 डिसेंबरला हा चित्रपट देशभर प्रदर्शित होणार आहे.

Filmmakers whose women change husbands everyday cannot understand ‘Jauhar’ | फिल्ममेकर्सच्या घरातील स्त्रिया रोज नवरे बदलतात त्यांना जौहरचा अर्थ काय समजणार ? - भाजपा खासदार

फिल्ममेकर्सच्या घरातील स्त्रिया रोज नवरे बदलतात त्यांना जौहरचा अर्थ काय समजणार ? - भाजपा खासदार

googlenewsNext
ठळक मुद्देकोणालाही राणी पद्मावती यांचा अपमान करु देणार नाही, इतिहासाशी मोडतोड अजिबात सहन करणार नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भन्साळी यांची मानसिक विकृती अजिबात सहन करणार नाही

नवी दिल्ली - संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटाला होणारा विरोध दिवसेंदिवस चालला वाढत आहे. येत्या 1 डिसेंबरला हा चित्रपट देशभर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला विरोध करणारे अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरत आहेत. भन्साळी सारख्या दिग्दर्शकाला फक्त चपलांची भाषा समजते. त्यांना दुसरी कुठली भाषा समजत नाही असे भाजपा खासदार चिंतामणी मालवीय यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. ते उज्जैन येथील भाजपा खासदार आहेत. 

कोणालाही राणी पद्मावती यांचा अपमान करु देणार नाही. इतिहासाशी मोडतोड अजिबात सहन करणार नाही असे 48 वर्षीय मालवीय यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. फिल्ममेकर्सच्या घरातील स्त्रिया रोज आपले नवरे बदलात, त्यांना जौहरचा अर्थ काय समजणार ?, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भन्साळी यांची मानसिक विकृती अजिबात सहन करणार नाही असा इशारा चिंतामणी मालवीय यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून दिला आहे. पैसा कमावण्याच्या लालसेपोटीच हा चित्रपट बनवण्यात आला आहे असे मालवीय यांनी म्हटले आहे. ते  मध्य प्रदेश भाजपाचे प्रवक्ते आहेत. 

काल हैदराबादच्या एका भाजपा आमदाराने पद्मावती सिनेमाला विरोध करत थिएटर्सच्या स्क्रीन जाळण्याचं वक्तव्य केलं आहे. राजपूत समुदायाच्या मंजुरीशिवाय राज्यात सिनेमा प्रदर्शित केला, तर थिएटर्सच्या स्क्रीन जाळू, असं वक्तव्य भाजपा आमदार राजा सिंह यांनी केलं आहे. 

रविवारी हैदराबादमध्ये झालेल्या राजपूत समुदायाच्या मेळाव्यात ते बोलत होते. राजा सिंह गोशामहलचे आमदार असून त्यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे प्रसिद्ध आहेत. हिंदू संस्कृतीची प्रतिमा कोणी मलिन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धडा शिकवू, असंही राजा सिंह यांनी म्हंटलं आहे. देशभरात पद्मावती सिनेमावर निषेध नोंदविला जातो आहे. पण इथे कुणीही सिनेमाबद्दल बोलत नाहीत. आपलं रक्त थंड झालं आहे, असं वक्तव्य राजा सिंह यांनी मेळाव्यात करून राजपूत समुदायांच्या लोकांना भडकाविण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातं आहे. 

पद्मावती सिनेमातून राणी पद्मावती यांची चुकीची प्रतिमा प्रतिमा असल्यास थिएटरची स्क्रीन जाळली तर त्या व्यक्तीला जामीन मिळवून देण्याची जबाबदारी माझी असेल, असंही ते म्हणाले.  सिनेमा प्रदर्शनापूर्वी तो राजपूत समुदायाला दाखवावा, त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही प्रदर्शनाता कुठलाही अडथळा निर्माण करणार नसल्याचं राजा सिंह यांनी म्हंटलं.

Web Title: Filmmakers whose women change husbands everyday cannot understand ‘Jauhar’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.