काल्पनिक भुताशी लढाई उच्चपदस्थांना अशोभनीय - पी. चिदंबरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 03:15 AM2017-10-30T03:15:05+5:302017-10-30T03:15:27+5:30

काल्पनिक भुतावर हल्ला चढवण्याचा प्रयोग उच्चपदावर बसलेल्या नेत्यांना शोभत नाही, असे परखड प्रत्युत्तर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदी यांचा नामोल्लेख न करता दिले.

Fighting with ghostly fate is unbeatable - P. Chidambaram | काल्पनिक भुताशी लढाई उच्चपदस्थांना अशोभनीय - पी. चिदंबरम

काल्पनिक भुताशी लढाई उच्चपदस्थांना अशोभनीय - पी. चिदंबरम

Next

सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : काल्पनिक भुतावर हल्ला चढवण्याचा प्रयोग उच्चपदावर बसलेल्या नेत्यांना शोभत नाही, असे परखड प्रत्युत्तर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदी यांचा नामोल्लेख न करता दिले.
बंगळुरूच्या सभेत माजी मंत्री चिंदम्बरम यांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. मोदी यांच्या या वक्तव्याचे खंडन करत चिदम्बरम यांनी वरील निवेदन प्रसृत केले.
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जुगलबंदी पंतप्रधान जाणीवपूर्वक, असे नमूद करीत काँग्रेस मुख्यालयातील सूत्रांनी सांगितले की, गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात असंतोषाच्या लाटा उसळत आहेत. पराभव समोर दिसत असल्याने हिंदु मुस्लिम मतांच्या विभाजनाचा अखेरचा डाव खेळण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधानांचे ताजे भाषण त्याच मालिकेचा पूर्वार्ध असावा असे दिसते आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, भाजपाने धार्मिक मतविभाजन घडवून गुजरातमधील आजवरच्या निवडणुका जिंकल्या. यंदा तशी संधी भाजपला मिळू नये यासाठी काँग्रेसने ५ गोष्टींचा अवलंब आपल्या प्रचारमोहिमेत केला. राहुल गांधींनी फक्त विविध मंदिरांचे दर्शन करून काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाला अनुकूल असल्याची प्रतिमा तयार केली. मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीपासून सातत्याने स्वत:ला दूर ठेवणाºया अहमद पटेलांनी केवळ पडद्यामागील हालचालींच्या मर्यादेत स्वत:ला ठेवले. गुजरातमधल्या मुस्लिम संघटना व काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांना भडक भाषणे करण्यापासून परावृत्त करण्याबरोबरच शांततेने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रचारमोहिमेत विशेषत: मुस्लिम बहुल लोकवस्त्यांमधे अनावश्यक जोशपूर्ण भाषणे टाळावीत, घोषणाबाजीत कोणालाही टार्गेट करणाºया घोषणांऐवजी देशाशी निगडीत घोषणा असाव्यात, प्रचारसभांव्दारे कोणताही वादविवाद सांप्रदायिक होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच भाजपकडून तसा प्रयत्न झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. सांप्रदायिक ध्रुवीकरणाची भाजपला जराशीही संधी मिळणार नाही, याची कसोशीने दक्षता घ्यावी, अशी ५ सूत्री स्वयंनिर्धारित संहिता काँग्रेसने पाळली.

काश्मीरच्या स्वायत्ततेबाबत जे विचार ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील लेखात मी व्यक्त केलेत, त्यात नेमके काय म्हटले आहे, हे न वाचताच माझ्यावर टीका सुरू झाली आहे. माझ्या लेखात कोणते वाक्य अथवा शब्द चुकीचा आहे, ते प्रथम स्पष्ट करावे आणि मगच आपले मत अथवा टीका करावी. - पी. चिदम्बरम

Web Title: Fighting with ghostly fate is unbeatable - P. Chidambaram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.