'इलेक्टोरल बाँड परिपूर्ण नाही, पण पूर्वीच्या प्रणालीपेक्षा चांगले': अर्थमंत्री निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 02:41 PM2024-03-15T14:41:09+5:302024-03-15T14:41:45+5:30

काल स्टेट बँक इंडियाने निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँडबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.

Electoral bond not perfect, but better than previous system Finance Minister Nirmala Sitharaman | 'इलेक्टोरल बाँड परिपूर्ण नाही, पण पूर्वीच्या प्रणालीपेक्षा चांगले': अर्थमंत्री निर्मला सीतारामन

'इलेक्टोरल बाँड परिपूर्ण नाही, पण पूर्वीच्या प्रणालीपेक्षा चांगले': अर्थमंत्री निर्मला सीतारामन

काल स्टेट बँक इंडियाने निवडणूक आयोगाला इलेक्टोरल बाँडबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. इलेक्टोरल बाँड्सबाबत देशात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कठोर निर्णय देत सर्व याद्या सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रोरल बाँडबाबत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी इलेक्ट्रोरल बाँड ही प्रणाली पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, इलेक्टोरल बाँड कदाचित परिपूर्ण नसतील पण ते पूर्वीच्या प्रणालीपेक्षा चांगले आहे. या आधी अस्तित्वात असलेली व्यवस्था यापेक्षा चांगली नव्हती. पूर्वीच्या प्रणालीपेक्षा चांगले आहे. पक्षाला खात्यातून किमान पैसे येत आहेत, त्याची आकडेवारी उपलब्ध होत आहे. 

इलेक्टोरल बॉण्डमध्ये तब्बल २७ कंपन्यांनी केला ५० कोटींपेक्षा जास्त खर्च, पाहा यादीत कुणाचे नाव?

"आता प्रत्येक पक्षापर्यंत पोहोचणारा पैसा व्हाईट आहे. एक चांगली प्रणाली येईपर्यंत, आम्ही आधीच अपडेट केलेल्या प्रणालीमध्ये काम करत आहोत. याशिवाय आता आमचे प्रयत्न अधिक चांगल्या सुधारणा घडवून आणण्याचे असले पाहिजेत, पारदर्शकता असावी आणि ती पूर्वीच्या व्यवस्थेपेक्षा चांगली असावी, असंही निर्मला सीतारमण म्हणाल्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम करत आहे. इलेक्टोरल बाँडचे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू आहे. एसबीआयने ही आकडेवारी सादर केली आहे. ही व्यवस्था चांगली नाही, पण जोपर्यंत परिपूर्ण व्यवस्था येत नाही तोपर्यंत ती पूर्वीच्या व्यवस्थेपेक्षा चांगली आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काहीही बोलत नाही. पक्षाला रोख स्वरूपात देणगी देण्याऐवजी किमान पैसे खात्यातून आलेले बरे, जेणेकरून त्याबाबतची किमान माहिती तरी राहते, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, असंही सीतारमण म्हणाल्या.

Web Title: Electoral bond not perfect, but better than previous system Finance Minister Nirmala Sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.