फारुख अब्दुल्ला यांना चौकशीसाठी ED ने पाठवले समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 09:04 PM2024-02-12T21:04:29+5:302024-02-12T21:06:59+5:30

Money Laundering Case: फारुख अब्दुल्ला यांना ईडीने मंगळवारी सकाळी हजर राहण्यास सांगितले आहे.

ED summons Farooq Abdullah for questioning, know what is the matter... | फारुख अब्दुल्ला यांना चौकशीसाठी ED ने पाठवले समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

फारुख अब्दुल्ला यांना चौकशीसाठी ED ने पाठवले समन्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण...

ED Summons Farooq Abdullah: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात समन्स बजावले असून, मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. हे प्रकरण जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. 

फारुख अब्दुल्ला यांच्यावर काय आरोप?
आरोपपत्रात म्हटले आहे की, फारुख अब्दुल्ला यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात खेळाच्या विकासाच्या नावाखाली जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आणि इतर लोकांकडून मिळालेला निधी इतरत्र वळवला आणि त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला. हा निधी अनेक खाजगी बँक खाती आणि जवळच्या नातेवाईकांना पाठवण्यात आला. नंतर निधी आपापसात वाटून घेतला. 

किती कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप?
2018 मध्ये ईडीने सीबीआयच्या आरोपपत्राच्या आधारे या प्रकरणात पीएमएलएची चौकशी सुरू केली. BCCI ने असोसिएशनला 112 कोटी रुपये दिले होते. त्यातून 43.6 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. 2001 ते 2012 दरम्यान फारुख अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना हा कथित घोटाळा झाला होता.

गेल्या महिन्यातही समन्स पाठवण्यात आले होते
लोकसभेत श्रीनगरचे प्रतिनिधित्व करणारे 86 वर्षीय फारुख अब्दुल्ला यांना गेल्या महिन्यातही याच प्रकरणात तपास यंत्रणेने समन्स बजावले होते. त्यावेळी प्रकृतीचे कारण सांगून ते श्रीनगर येथील ईडी कार्यालयात हजर राहिले नाहीत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर फारुख अब्दुल्ला हे नवे विरोधी नेते आहेत, ज्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. 

Web Title: ED summons Farooq Abdullah for questioning, know what is the matter...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.