दुर्गामातेला तब्बल 22 किलो सोन्याची साडी, किंमत वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 07:02 PM2017-09-26T19:02:15+5:302017-09-26T19:10:06+5:30

सध्या देशभरात नवरात्रोत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. ह्या दिवसात देवीची शक्तिरूपात मोठ्या थाटाने आराधना केली जाते. नवरात्र उत्सवात नऊ दिवस जगतजननीचा जागर घातला जातो.

Durgamita will be wearing 22 kg gold sari, worth the price | दुर्गामातेला तब्बल 22 किलो सोन्याची साडी, किंमत वाचून व्हाल थक्क

दुर्गामातेला तब्बल 22 किलो सोन्याची साडी, किंमत वाचून व्हाल थक्क

Next

कोलकाता - सध्या देशभरात नवरात्रोत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. ह्या दिवसात देवीची शक्तिरूपात मोठ्या थाटाने आराधना केली जाते. नवरात्र उत्सवात नऊ दिवस जगतजननीचा जागर घातला जातो. कोलकातामध्ये नवरात्रीचे हे 9 दिवस सण म्हणून साजरे केले जातात. कोलकातातील एका दुर्गामातेला 22 किलो वजनाची साडी घातली आहे. त्या साडीची किंमत सहा कोटी 50 लाख रुपये एवढी आहे.  सध्या या दुर्गामातेची भारतात चर्चा आहे. 

कोलकातामध्ये यावेळी लंडन ब्रिज, बिग बेन, लंडन आय आणि और बकिंघम पॅलेस यांचा देखावा केला आहे. यातील बकिंघम पॅलेसमध्ये असलेल्या दुर्गामातेला अस्सल 22 कॅरेटच्या सोन्यापासून तयार केलेली साडी घातली आहे. ही साडी 22 किलो वजनाची आहे. या साडीवर फूल आणि पानांच्या आकर्षक सजावटीसह मोराचं भरतकाम (एम्ब्रॉयडरी ) करण्यात आलं आहे. या साडीवर नक्षीकाम करताना जेम स्टोनचाही वापर करण्यात आला आहे. ही साडी बनवण्यासाठी 50 कलाकारांनी 75 दिवस मेहनत घेतली आहे. 

यावेळी दुर्गामातेच्या साडीसाठी आम्ही वेगळ आणि काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी कमिटीचे सचिव साजल घोष यांच्या डोक्यात ही सुरेख आयडिया   आली असे बकिंघम पॅलेस देवीच्या पूजा कमिटीचे अध्यक्ष प्रदीप घोष यांनी सांगितले. 
कोलकातामघ्ये यावर्षी वेगवेगळ्या उत्सव समितीद्वारा 3000 जागांवर दुर्गामातेच्या पूजेचं आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्येही दुर्गापूजेचा आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस हा उत्सव एखाद्या सणांमप्रमाणे केला जातो. 
 

Web Title: Durgamita will be wearing 22 kg gold sari, worth the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.