आदिवासी समाजामुळेच खूप शिकले : डॉ. स्मिता कोल्हे

By admin | Published: May 5, 2015 01:22 AM2015-05-05T01:22:05+5:302015-05-05T01:22:05+5:30

(फोटो आहे..)

Due to tribal communities, they learned a lot: Dr. Smita kolhey | आदिवासी समाजामुळेच खूप शिकले : डॉ. स्मिता कोल्हे

आदिवासी समाजामुळेच खूप शिकले : डॉ. स्मिता कोल्हे

Next
(फ
ोटो आहे..)
पणजी : मेळघाटातील मोहर फुलविताना समाजातील माणुसकीला सहन करावे लागणारे मुके अश्रू मी अनुभवले आहेत. स्वत:च्या भाकरीतली अर्धी भाकरी देणारी बैलपार आदिवासी जमातींचे संस्कार व संस्कृती मी शिकले. त्यांना शिकविण्यास जाणारी आम्ही शहरी सुशिक्षित मंडळी हा माज उतरला व मीच त्यांच्याकडून ३0 वर्षांत आयुष्याचे गूढ शिकून घेतले, असे गहिवरलेल्या मनस्थितीत डॉ. स्मिता कोल्हे यांनी सांगितले.
अनाम प्रेम संस्था आणि कला अकादमी यांच्या सहकार्याने मेळघाटातील बैलपार या गावात आदिवासी जमातीसाठी कार्य करणार्‍या डॉ. रवी व डॉ. स्मिता कोल्हे यांच्याशी संवाद हा कार्यक्रम कला अकादमीत आयोजिला होता. डॉ. स्मिता यांनी या वेळी पूर्वायुष्य आणि ३0 वर्षांचा मेळघाटातील प्रवास याबाबत प्रेक्षकांशी मुक्त संवाद साधला.
लग्नापूर्वीचे आयुष्य व मेळघाटाचा प्रवास
डॉ. स्मिता म्हणाल्या, माझे माहेर नागपूर जिल्‘ात. पूर्वीची स्मिता मांजरे. बीएपर्यंत कला, संगीत व नंतर पुन्हा कायदा आणि वैद्यकीय शिक्षण घेउन डॉक्टर झाले. सधन घराण्यातील व सुखवस्तू जीवन उपभोगणारी अशी मुलगी. केवळ ५ रुपयांत लग्न केले. मासिक ४00 रुपये मोडून संसार आणि ४0 किलोमीटर चालणे असा प्रवास या अटीवर डॉ. रवी कोल्हे यांच्याशी लग्नबंधनात अडकले. त्यानंतर जंगलमय भागात मेळघाटातील बैलपार या गावी संसार सुरू केला. बैलपार येथे दार नसलेले आणि हलक्याशा वार्‍यानेही छप्पर उडावे असे झोपडे. पावसाळ्यात घरातच पूर यायचा अशा परिस्थितीत संसार चालविला, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.
तेथील महिलांना अनेक समस्यांशी झुंजावे लागते याचा अंदाज कालांतराने येऊ लागला व महिलांसाठी लढाईत उतरावेच लागेल म्हणून कायद्याचा हात धरून त्यात झोकून दिले. आदिवासी महिलांचे दुसर्‍या समाजातील पुरुषांकडून होणारे शोषण थांबविणे ही महत्त्वाची लढाई होती. तेथील पोलीसही ज्या समाजाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत, घाबरत असत अशांशी लढा देऊन तिथल्या बायकांना कायद्याचे ताविज दिले. आज महिला स्वत:वर होणार्‍या अन्यायाविरोधात स्वत:च लढतात, असे कोल्हे म्हणाल्या.
(जोड बातमी...

Web Title: Due to tribal communities, they learned a lot: Dr. Smita kolhey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.