डॉ. के रामामूर्ती यांची इसिसच्या जाळ्यातून सुटका

By Admin | Published: February 26, 2017 07:40 AM2017-02-26T07:40:37+5:302017-02-26T07:40:37+5:30

दोन वर्षांपूर्वी इसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या डॉ. के रामामूर्ती यांची भारतीय सुरक्षा एजन्सींकडून सुटका करण्यात आली आहे.

Dr. Ramamurti's escape from Isis's hideout | डॉ. के रामामूर्ती यांची इसिसच्या जाळ्यातून सुटका

डॉ. के रामामूर्ती यांची इसिसच्या जाळ्यातून सुटका

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - दोन वर्षांपूर्वी इसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या डॉ. के रामामूर्ती यांची भारतीय सुरक्षा एजन्सींकडून सुटका करण्यात आली आहे. 
डॉ. के रामामूर्ती यांचे इसिस या दहशतवादी संघटनेने दोन वर्षांपूर्वी लिबियामधून अपहरण केले होते. त्यानंतर त्यांची शनिवारी इसिसच्या जाळ्यातून भारतीय सुरक्षा एजन्सींकडून सुटका करण्यात आली. यावेळी डॉ. के रामामूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एनएसए आणि सर्व अधिका-यांचे आभार मानले. 
इसिसकडून मला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा करण्यात येत नव्हती. मात्र, इसिसच्या दहशतवाद्यांवर उपचार करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता. परंतू मी कोणावरही कोणतीही शस्त्रक्रिया केली नाही. तसेच, त्यांच्याकडून शिवीगाळ करण्यात येत होती, असे डॉं. के रामामूर्ती यांनी यावेळी सांगितले.
 
 

Web Title: Dr. Ramamurti's escape from Isis's hideout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.