खोटारडेपणा काँग्रेसच्या डीएनएमध्ये : योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 06:35 PM2019-04-30T18:35:24+5:302019-04-30T18:40:02+5:30

शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारा सरकारी पैसा सुद्धा कॉंग्रेसने पचवले. भाजपने मात्र त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे टाकले. न्याय यात्रा काढणाऱ्या कॉंग्रेसने आयुष्यभर देशासोबत अन्याय केले.

Dove in the DNA of Congress: Yogi Adityanath | खोटारडेपणा काँग्रेसच्या डीएनएमध्ये : योगी आदित्यनाथ

खोटारडेपणा काँग्रेसच्या डीएनएमध्ये : योगी आदित्यनाथ

Next

मुंबई - काँग्रेस सरकारच्या काळात सरकारी निधी सामान्य व्यक्तीच्या हातात पडण्यापूर्वीच दलांच्या घश्यात जात असे. भाजप सरकारमध्ये येताच ही दलाली बंद झाली. आता प्रत्येक योजनेचे सर्व पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले जातात. काँग्रेसच्या डीएनए मध्येच खोटेपणा आहे अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. उत्तर प्रदेशच्या धौरहरा लोकसभा मतदार संघातील सभेत ते बोलत होते.

शेतकऱ्यांच्या खात्यात जाणारा सरकारी पैसा सुद्धा कॉंग्रेसने पचवले. भाजपने मात्र त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे टाकले. न्याय यात्रा काढणाऱ्या कॉंग्रेसने आयुष्यभर देशासोबत अन्याय केले. काँग्रेसमुळे देशाचा विकास होऊ शकला नाही. ७० वर्षे गरिबांना बैंकेत खाते उघडू दिले नाही आणि आज गरीबाला न्याय देण्याची भाषा करतात. देशाला कॉंग्रेसच्या पापातून मुक्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. काँग्रेस बरोबरच  बसपा आणि सपावर सुद्धा योगी आदित्यनाथ यांनी टीका केली.

कॉंग्रेसने दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घातली पण आम्ही त्यांना बंदुकाच्या गोळ्या  खाऊ घालू. देशात विकासकामांचा धडका मोदींनी लावला आहे. दहशतवाद आणि नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याच काम पुढील काळात भाजप करेल, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला.

उत्तर प्रदेशमधील धौरहरा लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार रेखा वर्मा यांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ बोलत होते. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रेखा वर्मा यांनी ३ लाख ६० हजारच्या फरकाने विजय मिळवला होता. भाजपने २०१९ मध्ये वर्मा यांना पुन्हा संधी दिली आहे.


 


 


 


 

Web Title: Dove in the DNA of Congress: Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.