काँग्रेसच्या कर्जमुक्तीवर विश्वास ठेवू नका- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 06:29 AM2018-11-21T06:29:57+5:302018-11-21T06:30:19+5:30

काँग्रैसने तुम्हा शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले.

 Do not trust Congress's debt relief - Narendra Modi | काँग्रेसच्या कर्जमुक्तीवर विश्वास ठेवू नका- नरेंद्र मोदी

काँग्रेसच्या कर्जमुक्तीवर विश्वास ठेवू नका- नरेंद्र मोदी

Next

झाबुआ : काँग्रैसने तुम्हा शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. कर्नाटकातही काँग्रेसने हे आश्वासन दिले होते; पण निवडणुकांनंतर तेथील शेतकºयांना कर्जमुक्ती मिळाली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
येथील जाहीर सभेत ते म्हणाले की, २0२२ पर्यंत सर्व शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे वचन आम्ही दिले आहे व ते पूर्ण करूनच दाखवू. प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे आमच्या सरकारने देशातील १४ कोटी लोकांना कोणत्याही जामिनाशिवाय कर्ज मिळवून दिले आहे. इतकी वर्षे सत्तेत राहून काँग्रेसला जे करता आले नाही, ते आम्ही अवघ्या चार वर्षांत करून दाखवले आहे, असा दावाही पंतप्रधानांनी यावेळी केला.
खोलवर रुतलेल्या भ्रष्टाचारासारख्या रोगावर इलाज करण्यासाठी आपणास नोटाबंदीसारखे कडवे
पाऊल उचलणे भागच होते. नोटाबंदीमुळे पैसा मोठ्या प्रमाणात बँकिंग सिस्टिममध्ये आला, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. आजार जितका त्रासदायक असेल, तितके औषधही कडक असते. नोटाबंदीमुळे लोकांना घरी, कार्यालयांत, कारखान्यांत लपवलेला पैसा बाहेर काढावा लागला, हे आपल्या योजनेचे मोठे यश आहे, असा दावा त्यांनी केला.

आमदाराला चपलांची माळ
भोपाळ : नागदा खचरोड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दिलीप शेखावत आपल्या मतदारसंघात सोमवारी मते मागण्यासाठी गेले असता, एका इसमाने त्यांच्या गळ्यात चपलांची माळच घातली. क्षणभर त्यांच्या ध्यानात हा प्रकार आला नाही. मात्र, लगेचच त्यांनी ती
माळ फेकून दिली आणि त्या इसमाला मारायला सुरुवात केली. दिलीप शेखावत मतदारसंघातील एका गावात मते मागण्यासाठी गेले असता, डोक्यावर भाजपाची टोपी घातलेला इसम त्यांच्यासमोर आला. तो आधी त्यांच्या पाया पडला आणि नंतर लगेचच त्याने शेखावत यांच्या गळ्यात चपलांची माळ घातली. शेखावत यांच्या कार्यकर्त्यांनीही त्या
इसमाला चांगलीच मारहाण केली.

Web Title:  Do not trust Congress's debt relief - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.