विचारस्वातंत्र्य गहाण ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 03:30 AM2018-02-19T03:30:19+5:302018-02-19T04:05:05+5:30

‘एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे

Do not keep your freedom free of charge | विचारस्वातंत्र्य गहाण ठेवू नका

विचारस्वातंत्र्य गहाण ठेवू नका

Next

प्रज्ञा केळकर-सिंग ।
महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदे) : ‘‘एखादे नाटक, चित्रपट आवडला नाही तर पाहू नका... पुस्तक आवडले नाही तर वाचू नका... मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मग दुसºयाला नाही का... एखादी कलाकृती आवडली नाही म्हणून विरोध करण्यासाठी चार दगड मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला,’’ असा थेट सवाल करत, लोकांसमोर सकारात्मक इतिहास मांडा, विचारस्वातंत्र्य कोणाच्याही चरणी वाहू नका, नम्रतेने चिकित्सा करा, प्रश्न विचारा, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी समाजाला उद्देशून दिला
धर्म, शासन, झुंडशाही आणि लेखक स्वत: हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे चार शत्रू आहेत. यातून बाहेर पडून नवा इतिहास घडवायचा असेल, तर उदारमतवादाची कास धरली पाहिजे, असे चपळगावकर यांनी सांगितले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारचा वाढता हस्तक्षेप, दुर्मिळ होत चाललेले विचारवंत, मातृभाषेचा वाढत चाललेला न्यूनगंड, लेखकांच्या वाढत्या राजकीय, आर्थिक महत्त्वाकांक्षा अशा विविध मुद्द्यांना त्यांनी निर्भीडपणे स्पर्श केला.
डॉ. सुधीर रसाळ आणि प्रशांत दीक्षित यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. चपळगावकर म्हणाले, ‘‘इंग्रजीच्या प्रतिष्ठेची चुकीची कल्पना हे मातृभाषेच्या न्यूनगंडाचे प्रमुख कारण आहे. इंग्रजी शाळांमध्ये चांगली पुस्तके, सुविधा मिळतात, त्या मराठी शाळेत मिळत नाहीत, असा समज आहे. मराठीची श्रीमंती वाढवायची असेल तर अभिजात दर्जाचा आग्रह धरतानाच नवे ज्ञान निर्माण करणे, व्यवहारात मराठीचा वापर वाढणे आणि अनुदान केंद्रे उभी राहणे गरजेचे आहे. बोलीभाषा टिकवणे, मराठी समृद्ध करणे, मुलांना वाचनाची गोडी लावणे, ही सध्याची महत्त्वपूर्ण आव्हाने आहेत.’’ ‘‘आपल्याकडे आलिशान घरे, महागड्या वस्तू, अद्ययावत सोयीसुविधा असतात. मात्र, घरात पुस्तके, विश्वकोशाचे खंड नाहीत, याची आपल्याला लाज वाटत नाही. भाषेचा वारसा टिकवणे हे व्यापक माध्यमवर्गाचे कर्तव्य आहे,’’ हे त्यांनी नमूद केले. लेखकाचे स्वातंत्र्य टिकायचे असेल तर राजकीय आणि आर्थिक महत्त्वकांक्षा बाळगणे चुकीचे आहे. यामुळे धाडसाने मते मांडणारे लेखक , विचारवंत दुर्मिळ होत आहेत. सरकार विचारवंतांना दावणीला बांधु पाहत आहे.

सर्जनाची कुंडली मांडता येत नाही. समाजात चांगले घडते, तेव्हा लेखकांना चैतन्य मिळते.
वाड्मयात नवनिर्मिती झाली पाहिजे.
उठसूट तलवारी हातात घेतात, त्यामागे विचार नसतो. समाजातील दोन घटकांमध्ये फळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. स्वायत्त संस्थांमधील हस्तक्षेप वाढला आहे.
सत्ताधाºयांनी विचारवंतांची भूक बाळगली पाहिजे.
सरकार केवळ समित्या नेमते, समित्यांनी वेगाने काम करावे, असे त्यांना वाटत नसते.
इंटरनेट माहिती उपलब्ध असते, ज्ञान नाही. ज्ञान भारतीय भाषेमध्ये निर्माण होते.
अनुवादाच्या माध्यमातून मराठी वाड्मयला जागतिक दर्जा मिळेल.

Web Title: Do not keep your freedom free of charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.