'पाकिस्तानवर गोळीबार करु नका, पण जर त्यांनी केला तर सोडू नका', भारतीय जवानांना आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 01:28 PM2017-10-09T13:28:02+5:302017-10-09T13:31:19+5:30

भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे

'Do not firing Pakistan, but if they do, do not give up', order for Indian soldiers | 'पाकिस्तानवर गोळीबार करु नका, पण जर त्यांनी केला तर सोडू नका', भारतीय जवानांना आदेश  

'पाकिस्तानवर गोळीबार करु नका, पण जर त्यांनी केला तर सोडू नका', भारतीय जवानांना आदेश  

Next
ठळक मुद्दे'भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत'पाकिस्तानने गोळीबार केल्यास असंख्य गोळ्यांचा वर्षाव करत योग्य ते उत्तर द्या असा राजनाथ सिंह यांचा आदेश 'चीनसोबत वादग्रस्त मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी भारताचा नेहमीच पुढाकार होता'

बंगळुरु - भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. तसंच पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, 'भारतीय जवानांना पाकिस्तानवर गोळीबार न करण्याचा आदेश दिला आहे. मात्र जर त्यांनी गोळीबार केल्यास असंख्य गोळ्यांचा वर्षाव करत योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला आहे'.

यावेळी राजनाथ सिंह यांनी डोकलाम मुद्द्यावरही भाष्य केलं. 'भारत आता अजिबात दुबळा देश नाही, एक मजबूत देश झाला आहे. चीनसोबत वादग्रस्त मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी भारताचा नेहमीच पुढाकार होता', असं राजनाथ सिंह बोलले आहेत. 

चीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारने तयार केली आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी दुपारी डोकलाम नाथु-ला क्षेत्राचे हवाई सर्वेक्षण केले. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुसºया व तिसºया टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून या दौºयाच्या निमित्ताने प्राप्त झाली.

भारत-चीन दरम्यानच्या सीमावर्ती भागात १00 पेक्षा अधिक खिंडी आहेत व त्यापैकी ९० टक्के खिंडी एवढ्या दुर्गम भागात आहेत की, तेथे जाण्यासाठी रस्तेच अस्तित्वात नाहीत. सिक्कीम जवळच्या नाथू-ला खिंडीप्रमाणे सीमावर्ती भागातील प्रत्येक खिंडीपाशी पायाभूत सुविधा तयार असाव्यात व त्यामुळे या क्षेत्रात भारतीय सैन्यदलांच्या हालचाली अधिक सुकर व्हाव्यात, अशी सरकारची रणनीती आहे. अरुणाचल प्रदेश, ईशान्य भारतात चीनला लागूून असलेल्या सीमेवर, तसेच उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आदी राज्यातल्या सीमावर्ती भागात २0२२ पूर्वी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे रस्ते बांधण्याची तयारी त्यासाठीच भारत सरकारने चालविली आहे. अशी माहिती या सूत्रांकडून प्राप्त झाली.

लष्कराने मोडलं दहशतवादाचं कंबरडं, भरती होणा-यांपेक्षा ठार होणा-या दहशतवाद्यांची संख्या जास्त
जम्मू काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या ठोस माहितीच्या आधारे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत दहशतवादाचं कंबरडं मोडण्यात यश मिळालं आहे. परिस्थिती तर अशी झाली आहे की, या वर्षात जितके दहशतवादी भरती झालेले नाहीत त्यापेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू काश्मीरात एकूण 71 दहशतवाद्यांची भरती करण्यात आली होती. मात्र लष्कराने कारवाई करत एकूण 132 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. 

यावर्षी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून 78 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. गतवर्षी 2016 मध्ये हा आकडा एकूण 123 होता. दहशतवाद्यांची ही आकडेवारी पाहता काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचं प्रमाणही कमी झाल्याचंच दिसत आहे. 

यावर्षी लष्कराने कारवाई करत ज्या 132 दहशतवाद्यांना ठार केलं, त्यामधील 74 विदेशी तर 58 स्थानिक दहशतवादी होते. यामधील 14 लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन आणि अल-बद्रचे टॉप कमांडर होते. राज्य पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवायांमध्ये मोठं यश हाती लागत असल्याचं दिसत आहे. 

लष्कराची मोठी कारवाई, सहा महिन्यात 92 दहशतवादी ठार
काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली असून त्याचा प्रभावही दिसू लागला आहे. यावर्षी 2 जुलैपर्यंत जवानांनी जवळपास 92 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. 2016 मध्ये जुलैपर्यंतची आकडेवारी पहायला गेल्यास हा आकडा 79 इतका होता. दहशतवादी विरोधी कारवाईत यावर्षी खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 2012 आणि 2013 मधील वार्षिक आकडेवारीपेक्षाही जास्त आहे. त्यावेळी युपीए सरकार सत्तेत होतं.
 

Web Title: 'Do not firing Pakistan, but if they do, do not give up', order for Indian soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.