धारवाडमधील दुर्घटनेतील मृतांची संख्या १२ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 04:59 AM2019-03-22T04:59:02+5:302019-03-22T05:00:01+5:30

धारवाड येथे बांधकाम सुरू असलेली बहुमजली इमारत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या बारावर पोहोचली आहे.

In Dharwad, the number of casualties was 12 | धारवाडमधील दुर्घटनेतील मृतांची संख्या १२ वर

धारवाडमधील दुर्घटनेतील मृतांची संख्या १२ वर

Next

धारवाड : येथे बांधकाम सुरू असलेली बहुमजली इमारत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या बारावर पोहोचली आहे. गुरुवारी ढिगाऱ्यातून आणखी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यात आठ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. दरम्यान मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी या दुर्घटनेची दंडाधिकारीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी या इमारतीचा आराखडा तयार करणारे अभियंता विवेक पवार याच्यासह चारजणांना अटक केली आहे. याशिवाय या प्रकरणात राज्याचे माजी मंत्री विजय कुलकर्णी यांच्या काही नातेवाईकांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कुमारेश्वर नगरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरू असताना मंगळवारी दुपारी दुसरा मजला कोसळला. त्यात अनेकजण ढिागाºयाखाली सापडले होते. त्यातील ५४ जणांना वाचविण्यात आले आहे. गुरुवारी तिसºया दिवशी ही ढिगारा उपसण्याचे काम सुरुच होते. आणखी दहाजण ढिगाºयाखाली अडकले असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.मृतामध्ये दुकानदार आणि कामगारांचा समावेश आहे.

Web Title: In Dharwad, the number of casualties was 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.