दीपाला BMW संभाळण्यासाठी दिले '२५ लाख'

By admin | Published: October 19, 2016 09:40 AM2016-10-19T09:40:06+5:302016-10-19T11:40:21+5:30

देशाचे नाव उंचावणा-या क्रीडापटूंच्या कौशल्याचा प्रसार व्हावा यासाठी हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष चामुंडेश्वरनाथ क्रीडापटूंना निरनिराळ्या माध्यमातून मदत करत आहेत.

Deepa gets '25 lakhs' for handling BMW | दीपाला BMW संभाळण्यासाठी दिले '२५ लाख'

दीपाला BMW संभाळण्यासाठी दिले '२५ लाख'

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 19 - रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केल्याबद्दल व्ही. चामुंडेश्वरनाथ यांनी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, सिंधूचे प्रशिक्षक पी. गोपीचंद,  कुस्तीपटू साक्षी मलिक आणि जिमनॅस्ट दीपा कर्माकरला महागडी बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून दिली. मात्र, दीपा कर्माकरने राहत्या असलेल्या ठिकाणी रस्त्यांची परिस्थिती चांगली नसल्याने तसेच बीएमडब्ल्यूच्या देखभालीचा खर्च परवडण्यासारखा नसल्याचे सांगितल्यानंतर चामुंडेश्वरनाथ यांनी तिच्या खात्यात 25 लाख रुपये जमा केले. 
 
देशातील क्रीडापटूंमध्ये असलेल्या कौशल्याचा प्रचार व्हावा, त्यांच्या कामगिरीचा सन्मान व्हावा, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावणा-या क्रीडापटूंना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये, यासाठी हैदराबाद बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. चामुंडेश्वरनाथ गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडापटूंना आपल्या परीने निरनिराळ्या माध्यमातून मदत करत आहेत. 
 
 
'दीपा कर्माकर आगरतळासारख्या ग्रामीण भागात रहात असल्याने तिला स्वतःची बीएमडब्ल्यू घेण्यासाठी अडचणी असतील असे मला वाटले, म्हणून तिल कार भेट स्वरुपात दिली', असे व्ही. चामुंडेश्वर यांनी म्हटले.  चामुंडेश्वर यांनी आतापर्यंत जवळपास अशा प्रकारच्या 17  महागड्या कार भेट स्वरुपात दिल्या आहेत, ज्यांनी क्रीडा क्षेत्रात जिद्दी दाखवून, मेहनत करुन स्वतःचे आणि देशाचे नाव उंचावले आहे.  
 
'खरेतर सुरुवातीला केवळ पी.व्ही. सिंधू आणि पी. गोपीचंद यांनाच बीएमडब्ल्यू भेट देण्याचे प्राथमिक स्वरुपात ठरले होते. माझ्याजवळ आणि मित्रांकडेही दोन बीएमडब्ल्यू भेट देण्याइतपत आर्थिक पाठबळ आहे. मात्र सचिन तेंडुलकरने रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपा कर्माकर आणि साक्षी मलिकनेही उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगितले, आणि दोघांऐवजी चारही जणांना बीएमडब्ल्यू भेट देण्याचे सुचवले, यासाठी त्याने गाड्यांच्या किंमती सवलत मिळण्यासाठीही मदत केली',  असेही चामुंडेश्वरनाथ यांनी सांगितले. 
 
या चार बीएमडब्ल्यू कारची किंमती 1.25 कोटी रुपये एवढी आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीकडे असलेल्या कौशल्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा, या उद्देशाने त्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने  निरनिराळ्या पद्धतीने त्यांना सहाय्य करण्याचे काम चामुंडेश्वर गेल्या 10 वर्षांपेक्षा अधिक काळापासून करत आले आहेत.चामुंडेश्वरनाथ यांनी आतापर्यंत सायना नेहवाल, पी गोपीचंद, किंदम्बी श्रीकांत सारख्या क्रीडापटूंनी चांगली कामगिरी केल्याबाबत त्यांचाही भेटवस्तू देऊन गौरव केला आहे.
 
कॉर्पोरेट जगतात चामुंडेश्वर यांची ओळख 'एक चांगले व्यक्तीमत्त्व' अशी आहे. मात्र, या व्यक्तीच्या नावासोबत वाद जोडले गेले नसतील तर नवलच. आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप ठेवत 2009 मध्ये आंध्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिवपदावरुन त्यांना काढण्यात आले होते. तसेच आंध्रच्या महिला क्रिकेट असोसिएशनकडून त्यांच्याविरोधात लैंगिक छळाचादेखील तक्रार करण्यात आली होती. मात्र, हे सर्व कटकारस्थान क्रिकेट असोसिशनमधील माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी केल्याचे सांगत चामुंडेश्वर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 
 

Web Title: Deepa gets '25 lakhs' for handling BMW

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.