Arvind Kejriwal : 'माझं जीवन देशाला समर्पित...', अटकेनंतर न्यायालयात बोलले अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 03:56 PM2024-03-22T15:56:34+5:302024-03-22T15:57:02+5:30

केजरीवाल यांना अटक केल्यानंतर, आम आदमी पार्टीसह I.N.D.I.A. तील सर्वच पक्ष भाजप आणि केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले असून केजरीवालांच्या अटकेला कडाडून विरोध करत आहेत.

Dedicated my life to the country Arvind Kejriwal spoke in the court after the arrest | Arvind Kejriwal : 'माझं जीवन देशाला समर्पित...', अटकेनंतर न्यायालयात बोलले अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal : 'माझं जीवन देशाला समर्पित...', अटकेनंतर न्यायालयात बोलले अरविंद केजरीवाल

आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात गुरुवारी अटक करण्यात आली. ईडीने गुरुवारी 10 वे समन बजावत त्यांना अटक केली. या प्रकरणावर आता खुद्द अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ईडीने केजरीवाल यांना आज (शुक्रवारी) ​राऊज एव्हेन्यू न्यायालयात हजर केले. येथे 'आपले जीवन देशाला समर्पित आहे,' असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

केजरीवाल यांना अटक केल्यानंतर, आम आदमी पार्टीसह I.N.D.I.A. तील सर्वच पक्ष भाजप आणि केंद्र सरकार विरोधात आक्रमक झाले असून केजरीवालांच्या अटकेला कडाडून विरोध करत आहेत. तसेच, जोवर केजरीवालांची सुटका होत नाही, तोवर हे अभियान सुरूच राहील, असे आपने म्हटले आहे.

केजरीवालांना कधी-कधी पाठवले समन - 
- पहिले 02 नोव्हेंबर, 2023
- दुसरे 18 डिसेंबर, 2023
- तिसरे 03 जेनेवारी, 2024
- चौथे 18 जानेवारी, 2024
- पाचवे 02 फेब्रुवारी, 2024
- सहावे 19 फेब्रुवारी, 2024
- सातवे 26 फेब्रुवारी, 2024
- आठवे 04 मार्च 2024
- नववे 17 मार्च 2024

असे अडकले केजरीवाल? -
मनीष सिसोदिया यांच्या जामिनासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, या प्रकरणी आपण संपूर्ण पक्ष अथवा पक्षाच्या प्रमुखांनाही समन पाठवणार का? असा प्रश्न न्ययालयाने ईडीला विचारला होता. यावर, विचार करू, असे सॉलिसिटर जनरल यांनी म्हटले होते. यानंतर, ईडीने अरविंद केजरीवाल यांना पहिले समन पाठवले होते. दिल्ली अबकारी नीती प्रकरणाशी अरविंद केजरीवाल यांचा संबंध होता, असा ईडीचा आरोप आहे. ईडीच्या मते, मद्य नीती लागू करण्यात कथित भ्रष्टाचार झाला आहे. जो 338 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. 
 

Web Title: Dedicated my life to the country Arvind Kejriwal spoke in the court after the arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.