तामिळनाडूत जलीकट्टू खेळादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 05:25 PM2018-01-16T17:25:09+5:302018-01-16T17:25:15+5:30

तामिळनाडूमधील जलीकट्टू खेळादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. याआधी काल (दि.15) एका प्रेक्षकाचा मृत्यू झाला होता. 

Death of two more during Tamil Nadu's Jalletta Games, question marks on the security system | तामिळनाडूत जलीकट्टू खेळादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 

तामिळनाडूत जलीकट्टू खेळादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 

Next

मदुराई : तामिळनाडूमधील जलीकट्टू खेळादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. याआधी काल (दि.15) एका प्रेक्षकाचा मृत्यू झाला होता. 
तामिळनाडू येथील शिवागंगाई जिल्ह्यात मंगळवारी जलीकट्टू खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खेळादरम्यान उधळलेल्या बैलाने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. रामानाथन आणि काशी अशी या मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. दरम्यान, काल मदुराई येथे जलीकट्टू खेळादरम्यान एका प्रेक्षकाचा मृत्यू झाला आणि जवळपास 25 जण जखमी झाले. त्यातील 6 जणांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मंगळवारी या जीवघेण्या खेळात डिंडीगुल इथल्या सनारपट्टी भागातल्या 19 वर्षीय एस कलिमुथु या प्रेक्षकाचा मृत्यू झाला. उधळलेल्या बैलानं जलीकट्टू खेळ पाहण्यासाठी आलेल्या कलिमुथुसह अनेक लोकांवर हल्ला चढवला. यात कलिमुथु या प्रेक्षकाचा मृत्यू झाला. या वर्षीच्या खेळाचा तामिळनाडूतील हा पहिला बळी ठरला. त्यानंतर आज पुन्हा शिवागंगाईमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने हा आकडा तीनवर पोहचला आहे. 
या घटनेमुळे  पुन्हा एकदा वादात सापडलेल्या या जलीकट्टू खेळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या वादग्रस्त खेळाचे आयोजन तामिळनाडूध्ये ठिकठिकाणी करण्यात येत आहे. दक्षिण भारतात साजरा करण्यात येणा-या पोंगल या सणाच्या दरम्यानच जलीकट्टू खेळाचे आयोजन करण्यात येते.
 

Web Title: Death of two more during Tamil Nadu's Jalletta Games, question marks on the security system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.