खळबळजनक! साडी नेसून 'तो' घरात घुसला, महिलेच्या जवळ गेला अन्...; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 04:12 PM2024-01-14T16:12:39+5:302024-01-14T16:22:06+5:30

एका व्यक्तीने आपला भयंकर हेतू पूर्ण करण्यासाठी महिलेचं रूप धारण केले. त्याने साडी नेसली आणि घरात प्रवेश केला.

datia man wears saree fill mang for dangerous intention horrible scene in datia police | खळबळजनक! साडी नेसून 'तो' घरात घुसला, महिलेच्या जवळ गेला अन्...; नेमकं काय घडलं?

फोटो - hindi.news18

मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपला भयंकर हेतू पूर्ण करण्यासाठी महिलेचं रूप धारण केले. त्याने साडी नेसली आणि महिलेच्या घरात प्रवेश केला. त्याने एका महिलेवर चाकूने हल्ला केला. तिचे कानातले ओढण्याचा प्रयत्न केला. त्यात अपयश आल्यानंतर तो पळून जाऊ लागला तेव्हा लोकांनी त्याचा पाठलाग करून पकडले. 

लोकांनी या व्यक्तीला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. ते त्याची चौकशी करत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मतन पहारा येथे घडली. अचानक घरातून किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. हा आवाज ऐकून लोक घराबाहेर जमू लागले आणि एक साडी नेसलेली महिला घरातून पळत असल्याचं दिसलं. 

लोकांनी लगेच पाठलाग करून पकडलं. लोकांनी पकडल्यानंतर त्यांना धक्काच बसला. कारण साडी नेसलेली महिला नसून तो एक पुरुष होता. त्याने व्यवस्थित साडी नेसली होती आणि स्त्रीसारखा मेकअप केला होता. लोकांनी त्याला मारहाण करून पुन्हा घटनास्थळी आणले. यानंतर लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. लोकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फोन करून घटनास्थळी बोलावले. पोलीस येताच लोकांनी आरोपीला त्यांच्या ताब्यात दिलं. 

पोलिसांच्या चौकशीत तरुणाने आपलं नाव अरविंद जाटव असल्याचं सांगितलं. तो ग्वाल्हेरचा रहिवासी आहे. तो एका घरात घुसल्याचं पोलिसांनी सांगितलं. कोणाला काही समजण्याआधीच त्याने महिलेचे कानातले खेचण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. यानंतर घरात उपस्थित महिलांनी आरडाओरडा सुरू केल्यावर तो पळून गेला.
 

Web Title: datia man wears saree fill mang for dangerous intention horrible scene in datia police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.