अन् लष्करातील जवानाने लकवाग्रस्त मुलाला स्वत:च्या हाताने भरवले जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 04:03 PM2019-05-14T16:03:44+5:302019-05-14T16:05:32+5:30

केवळ रणांगणातील शौर्यामुळेच नाही तर शांतताकालीन मानवतावादी कार्यांमुळे भारतीय लष्कराबाबत देशवासियांच्या मनात आदराची भावना आहे.

CRPF Havaldar Iqbal Singh deployed in Srinagar feeds his lunch to a paralytic child | अन् लष्करातील जवानाने लकवाग्रस्त मुलाला स्वत:च्या हाताने भरवले जेवण

अन् लष्करातील जवानाने लकवाग्रस्त मुलाला स्वत:च्या हाताने भरवले जेवण

Next

श्रीनगर -  केवळ रणांगणातील शौर्यामुळेच नाही तर शांतताकालीन मानवतावादी कार्यांमुळे भारतीय लष्कराबाबत देशवासियांच्या मनात आदराची भावना आहे. देशाच्या संरक्षणाबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत देशवासियांच्या मदतीसाठी लष्कर नेहमीच धावून येत, असते. दरम्यान, सध्या भारतीय लष्करातील जवानाचा एका लहान काश्मिरी मुलासोबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक भारतीय जवान लहान काश्मिरी मुलाला भोजन भरवताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील असून, येथे सुरक्षेसाठी तेनात असलेले सीआरपीएफ हवालदार इक्बाल सिंह यांना एक लकवाग्रस्त मुलगा भुकेल्या अवस्थेत सापडला होता. त्यावेळी इक्बाल सिंह यांनी या मुलाची विचारपूस करून त्याला स्वत:च्या हातांनी भोजन भरवले. त्यावेळी टिपण्यात आलेला हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान, इक्बाल सिंह यांनी मानवतावादी दृष्टीकोन ठेवून केलेल्या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. तसेच लष्कराने देखील हवालदार सिंह यांच्या मानवतावादी दृष्टीकोनाचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे. 




विशेष बाब म्हणजे 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामना येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावेळी इक्बाल सिंह हे सुद्धा त्या ताफ्यामध्ये होते. या ताफ्यामधील एक वाहन इक्बाल सिंह हे चालवत होते.  

Web Title: CRPF Havaldar Iqbal Singh deployed in Srinagar feeds his lunch to a paralytic child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.