वेगाने पसरतोय कोरोना JN.1 सब व्हेरिएंट; AIIMS ने केलं अलर्ट, सांगितली 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 06:46 PM2023-12-29T18:46:32+5:302023-12-29T18:47:37+5:30

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने म्हटलं आहे की हा सब व्हेरिएंट BA.2.86 मध्ये एक एक्स्ट्रा म्यूटेशन तयार करतो आणि तो खूप वेगाने पसरतो. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे.

covid-19 new sub variant jn1 sign symptoms testing will be done for patients | वेगाने पसरतोय कोरोना JN.1 सब व्हेरिएंट; AIIMS ने केलं अलर्ट, सांगितली 'ही' आहेत लक्षणं

वेगाने पसरतोय कोरोना JN.1 सब व्हेरिएंट; AIIMS ने केलं अलर्ट, सांगितली 'ही' आहेत लक्षणं

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नव्या सब व्हेरिएंटने सर्वांची चिंता वाढवली. केंद्र सरकारने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की भारतात कोरोनाचे 702 नवीन रुग्ण आणि 6 मृत्यूची नोंद एका दिवसात झाली आहे. आता एक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,097 वर पोहोचली आहे. गुरुवारी अद्ययावत केलेल्या INSACOG डेटानुसार, देशात JN.1 सब व्हेरिएंटची एकूण संख्या 157 वर पोहोचली आहे आणि केरळमध्ये सर्वाधिक 78 रुग्ण नोंदवले गेले आहेत आणि त्यानंतर गुजरातमध्ये 34 रुग्ण आहेत.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने म्हटलं आहे की हा सब व्हेरिएंट BA.2.86 मध्ये एक एक्स्ट्रा म्यूटेशन तयार करतो आणि तो खूप वेगाने पसरतो. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे. दिल्लीत JN.1 सब-व्हेरिएंटचे प्रकरण आढळल्यानंतर एम्सने असंही सांगितलं आहे की ज्या लोकांमध्ये लक्षणं आहेत त्यांनी अजिबात हलगर्जीपणा करू नये आणि ही लक्षणं दिसल्यास लगेच चाचणी करा.

AIIMS व्यवस्थापनाच्या कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांनुसार, SARI (गंभीर तीव्र श्वसन संक्रमण) असलेल्या रूग्णांची कोरोना चाचणी केली जाईल ज्यांना श्वसन संक्रमण, सतत ताप येणे किंवा 10 दिवसांपेक्षा जास्त काळ 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे. 

इतर तज्ञांचे म्हणणे आहे की कोविड -19 च्या विविध प्रकारांमुळे, त्याच्या लक्षणांमध्ये बदल दिसू शकतात कारण भारतातील लोकांना लसीचे डोस मिळाले आहेत. अनेकांना बूस्टर डोसही मिळाला आहे. प्रत्येक शरीर आणि त्याची प्रतिकारशक्ती यावर अवलंबून, लोकांमध्ये भिन्न लक्षणे दिसू शकतात. CDC ने 8 डिसेंबर रोजी एका अहवालात म्हटले होते, 'JN.1 ची लक्षणे किती गंभीर आहेत हे त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्यावर अवलंबून असते.'

यूकेच्या आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की कोविडच्या JN.1 सब व्हेरिएंटने संक्रमित लोकांमध्ये काही लक्षणं नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. 

- घसा खवखवणे
- निद्रानाशाची समस्या
- चिंता
-  सर्दी
- खोकला
- डोकेदुखी
- अशक्तपणा किंवा थकवा

यूकेच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, 'खोकला, घसा खवखवणे, शिंका येणे, थकवा आणि डोकेदुखी ही काही सामान्यपणे नोंदवलेली लक्षणे आहेत परंतु ही इन्फ्लूएंझाची लक्षणे देखील असू शकतात, म्हणून प्रथम चाचणी करा.'

JN.1 व्हेरिएंट 41 देशांमध्ये पसरला आहे. WHO म्हणते की JN.1 सब व्हेरिएंटच्या उदयामुळे कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते, विशेषतः ज्या देशांमध्ये हिवाळा अधिक तीव्र असतो. तज्ञ म्हणतात, 'जागतिक स्तरावर प्रकरणांमध्ये झालेली वाढ हे दर्शवते की JN.1 - Omicron चे सब व्हेरिएंट मजबूत प्रतिकारशक्ती असलेल्यांनाही सहज संक्रमित करू शकते. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने याचे वर्णन यूएस मध्ये सर्वात वेगाने पसरणारा व्हेरिएंट म्हणून केलं आहे.

Web Title: covid-19 new sub variant jn1 sign symptoms testing will be done for patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.