Coronavirus Updates: गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 729 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 221 जणांचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 12:13 PM2021-11-05T12:13:49+5:302021-11-05T12:23:43+5:30

देशात आतापर्यंत 107 कोटी 70 लाख 46 हजार 116 जणांना लस देण्यात आली आहे. 

Coronavirus Updates: 11,729 new coronavirus cases recorded across the india in last 24 hours; 221 people died | Coronavirus Updates: गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 729 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 221 जणांचा झाला मृत्यू

Coronavirus Updates: गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 729 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 221 जणांचा झाला मृत्यू

googlenewsNext

नवी दिल्ली: गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 729 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 48 हजार 922 वर पोहोचली आहे. दिवसभरात 221 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 37 लाख 24 हजार 959 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल कोरोनाच्या 5 लाख 65 हजार 276 लसीचे डोस देण्यात आले आहेत. ज्यानंतर देशात आतापर्यंत 107 कोटी 70 लाख 46 हजार 116 जणांना लस देण्यात आली आहे. 

राज्यात गेल्या 24 तासांत 1,141 रुग्णांची भर पडली आहे तर एकूण 32 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यात एकूण 1,163 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 64,56,263 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.6 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या 15 हजार 062  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 1,86,432 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 878  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6,30,47,584 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

दरम्यान, जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 24 कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णसंख्या 248,824,610 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 5,037,026 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेकांनी उपचारानंतर कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जगभरात 225,450,289 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

Web Title: Coronavirus Updates: 11,729 new coronavirus cases recorded across the india in last 24 hours; 221 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.