वेगानं पसरतोय कोरोनाचा जेएन.1 सब-व्हेरिअंट, AIIMS नं सांगितलं ही लक्षणं दिसताच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 12:18 PM2023-12-29T12:18:09+5:302023-12-29T12:19:12+5:30

COVID-19 New Jn.1 Variant : जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हा सब-व्हेरिअंट BA.2.86 मध्ये एक एक्स्ट्रा म्यूटेशन होऊन तयार झाला आहे आणि तो अत्यंत वेगाने पसरतो.

Corona's JN.1 sub-variant is spreading fast, AIIMS said, be careful as soon as you see these symptoms | वेगानं पसरतोय कोरोनाचा जेएन.1 सब-व्हेरिअंट, AIIMS नं सांगितलं ही लक्षणं दिसताच व्हा सावध!

वेगानं पसरतोय कोरोनाचा जेएन.1 सब-व्हेरिअंट, AIIMS नं सांगितलं ही लक्षणं दिसताच व्हा सावध!

देशातील कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. तसेच, जेएन.1 सब-व्हेरिअंटची प्रकरणंही समोर आल्यानंतर, केंद्र सरकारने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, भारतात एका दिवसात 702 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झला आहे. आता एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,097 झाली आहे. 

जेएन.1 सब-व्हेरिअंट आणि BA.2.86 मुळे कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे. गुरुवारी अपडेट करण्यात आलेल्या INSACOG च्या नव्या आकडेवारीनुसार, देशात JN.1 सब-व्हेरिअँट बाधितांची संख्या 157 वर पोहोचली आहे. यात केरळमध्ये सर्वाधिक 78 रुग्ण आहेत. तर यानंतर गुजरातेत 34 रुग्णांची नोंद झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हा सब-व्हेरिअंट BA.2.86 मध्ये एक एक्स्ट्रा म्यूटेशन होऊन तयार झाला आहे आणि तो अत्यंत वेगाने पसरतो. यामुळे सर्वांनीच सावध राहणे आवश्यक आहे. दिल्लीमध्ये जेएन.1 सब-व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्यानंतर, कोणती लक्षणं असणाऱ्यांनी बिल्कुलच निष्काळजीपणा करू नये आणि तत्काळ तपासणी करायला हवी, हे एम्सने सांगितले आहे.

ही लक्षण दिसल्यानंतर हलगर्जीपणा करू नका? -
AIIMS व्यवस्थापनाच्या COVID-19 मार्गदर्शक तत्त्वांनुसार, SARI (तीव्र श्वसन संक्रमण) सारखी लक्षणं असणाऱ्या लोकांची कोरोना टेस्ट करण्यात येईल. यात तीव्र श्वसन संक्रमण, सलग ताप अथवा 10 दिवसांपेक्षा अधिक 38 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त ताप आदींचा समावेश होतो.

इंग्लंडमधील आरोग्य जज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या जेएन.1 सब-व्हेरिअंटची लागण झालेल्या लोकांनी काही संकेत सांगितले आहेत. यात... -
- घसा खवखवणे
- झोप न येण्याची समस्या
- एंग्झायटी
- नाक वाहणे
- खोकला
- डोकेदुखी
- अशक्तपणा अथवा थकवा
- मसल्स पेन 
आदींचा समावेश आहे...

Web Title: Corona's JN.1 sub-variant is spreading fast, AIIMS said, be careful as soon as you see these symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.