Corona Vaccine Booster Dose: आजपासून ‘या’ लोकांना मिळणार बूस्टर डोस; जाणून घ्या, काय आहे प्रक्रिया?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 08:22 AM2022-01-10T08:22:54+5:302022-01-10T08:24:05+5:30

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बूस्टर डोस घेण्यासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करणं गरजेचे नाही. त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत.

Corona Vaccine Booster Dose: From today, Seniors, Frontline Workers will get Booster Dose in India | Corona Vaccine Booster Dose: आजपासून ‘या’ लोकांना मिळणार बूस्टर डोस; जाणून घ्या, काय आहे प्रक्रिया?

Corona Vaccine Booster Dose: आजपासून ‘या’ लोकांना मिळणार बूस्टर डोस; जाणून घ्या, काय आहे प्रक्रिया?

googlenewsNext

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या ओमायक्रॉनमुळे(Omicron) व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत होत आहे. कोरोनाची तिसरी लाट देशात धडकली असून सरकारकडून निर्बंधासारखे पाऊलं उचलण्यात आली आहे. आजपासून आरोग्य कर्मचारी आणि ६० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. परंतु या बूस्टर डोसवरुन अनेक प्रश्च सर्वसामान्यांच्या मनात आहेत. तिसरा डोस कोणत्या लसीचा घ्यायचा? रजिस्ट्रेशन पुन्हा करावं लागेल का? किती वेळानंतर बूस्टर डोस घ्यायचा? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.

कोणती लस घ्यावी लागेल?

भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, जे लोक बूस्टर डोस घ्यायला जाणार आहेत. त्यांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिलेली लसच पुन्हा द्यावी. म्हणजे जर तुम्ही कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर तुम्हाला बूस्टर डोसही कोविशील्ड लसीचा घ्यावा लागेल.

रजिस्ट्रेशन करावं लागेल का?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बूस्टर डोस घेण्यासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करणं गरजेचे नाही. त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत. सुरुवातीला ते Cowin APP वर जाऊन वेळ घेऊ शकतात. या App वर बूस्टर डोसची वेगळा पर्याय दिला आहे. त्याठिकाणी सुलभपणे तुम्ही वेळ घेऊ शकता. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही थेट लसीकरण केंद्रावर जात लसीकरण करुन घेऊ शकता. त्याठिकाणीही दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.

किती कालावधीनंतर बूस्टर डोस घेऊ शकता?

जर तुम्ही कोरोना लसीचा दुसरा डोस ९ महिन्यापूर्वी घेतला आहे. तर तिसऱ्या डोससाठी नोंदणी करु शकता. जर दुसरा डोस घेऊन ९ महिन्यापेक्षा कमी कालावधी झाला असेल तर बूस्टर डोससाठी वाट पाहावी लागेल.

लसीकरण केंद्रावर प्रमाणपत्र दाखवावं लागेल?

जर तुमचं वय ६० वर्षापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही इतर आजाराने त्रस्त आहात तर विना रजिस्ट्रेशन अथवा प्रमाणपत्र लसीचा डोस घेऊ शकतो. परंतु आरोग्य मंत्रालयाने तिसरा डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगितले आहे.

बूस्टर डोसनंतर लसीकरण प्रमाणपत्र मिळेल?

होय, नेहमीप्रमाणे जर तुम्ही कोरोना लसीचा तिसरा डोस घेतला असेल तर तुमचं प्रमाणपत्र रजिस्टर्ड मोबाईलवर पाठवलं जाईल. त्यात जन्मतारीख आणि अन्य महत्त्वाची माहिती असेल.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरच्यांनाही लस मिळणार?

नाही, केवळ फ्रंन्टलाईन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाच बूस्टर डोस दिला जाईल जे कोरोना काळात हॉस्पिटल अथवा बाहेर ड्युटी करण्यासाठी जात आहेत. फ्रंन्टलाईन वर्कर्समध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लसीकरण केंद्रावर कोणती कागदपत्रे घेऊन जावीत?

जर बूस्टर डोस घ्यायचा असेल तर तुमच्यासोबत मतदार कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना यापैकी कुठलेही एक ओळखपत्र घेऊन जावं लागेल. त्याचआधारे तुम्हाला लसीचा बूस्टर डोस दिला जाईल.

Web Title: Corona Vaccine Booster Dose: From today, Seniors, Frontline Workers will get Booster Dose in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.