कार्नेलिया सोराबजींचे केले गुगलने स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:39 PM2017-11-15T22:39:10+5:302017-11-15T22:39:18+5:30

देशाच्या पहिल्या वकील आणि ब्रिटनमधील भारताच्या पहिल्या महिला विद्यार्थी कॉर्नेलिया सोराबजी यांना सर्च इंजिन गुगलने बुधवारी खास चित्र (डुडल) काढून त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

Cornellia Sorabjee's made by Google | कार्नेलिया सोराबजींचे केले गुगलने स्मरण

कार्नेलिया सोराबजींचे केले गुगलने स्मरण

Next
ठळक मुद्देसोराबजी या अलाहाबाद उच्च न्यायालय वकील संघात जाणाºया पहिल्या महिला होत्या. त्यांनी पडदानशीन महिलांच्या हक्कांसाठी न थांबता लढा दिला. सामाजिक रुढी म्हणून त्याकाळी बुरख्यातील महिलांना त्यांच्या कुटुंबियांशिवाय इतरांच्या संपर्कात यायला मनाई होती.

नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या वकील आणि ब्रिटनमधील भारताच्या पहिल्या महिला विद्यार्थी कॉर्नेलिया सोराबजी यांना सर्च इंजिन गुगलने बुधवारी खास चित्र (डुडल) काढून त्यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. सोराबजी यांचा जन्म १८६६ मध्ये महाराष्टातील नाशिक येथे झाला. त्या मुंबई विद्यापीठातील पहिल्या महिला पदवीधर होत्या. सोराबजी यांचे गुगलच्या होमपेजवरील चित्र जसज्योत सिंग हान्स यांनी काढलेले आहे. सोराबजी या चित्रात अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर पांढºया विगमध्ये व वकिलाच्या काळ््या डगल्यात दिसतात.
सोराबजी या अलाहाबाद उच्च न्यायालय वकील संघात जाणाºया पहिल्या महिला होत्या. त्यांनी पडदानशीन महिलांच्या हक्कांसाठी न थांबता लढा दिला. सामाजिक रुढी म्हणून त्याकाळी बुरख्यातील महिलांना त्यांच्या कुटुंबियांशिवाय इतरांच्या संपर्कात यायला मनाई होती.
‘सोराबजी यांच्या १५१ व्या जयंतीचे महत्व काय तर अनेक प्रकारची प्रतिकूल परिस्थिती असतानाही कॉर्नेलिया सोराबजी यांनी रुढींचे अडथळे फोडले व दाखवलेली चिकाटी’, असे गुगलच्या डुडल पेजवर म्हटले आहे. सोराजबी यांना वकिली व्यवसाय करण्यास बंदी घातल्यानंतर त्या पडदानशीनांसाठी सरकारच्या कायदा सल्लागार बनल्या. सोराबजी या १८९२ मध्ये आॅक्सफर्ड विद्यापीठात कायदा शिकल्या. तथापि, त्या दिवसांत त्यांना विद्यापीठाने पदवी दिली नाही. हा नियम ३० वर्षांनंतर म्हणजे १९२२ मध्ये बदलला. परंतु पदवी न मिळाल्यामुळे त्यांना इंग्लडमध्ये वकिली करता आली नाही. त्या १८९४ मध्ये भारतात परतल्या परंतु १९२० पर्यंत त्यांना वकिली करण्यास परवानगी दिली गेली नव्हती.
 

Web Title: Cornellia Sorabjee's made by Google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.