वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक भारतात येणार?; मलेशिया सरकारची प्रत्यार्पणाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 02:03 PM2018-07-04T14:03:29+5:302018-07-04T14:19:24+5:30

वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू व इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) संस्थेचा संस्थापक झाकीर नाईक आज भारतात येणार आहे.

Controversial Preacher Zakir Naik To Return To India | वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक भारतात येणार?; मलेशिया सरकारची प्रत्यार्पणाची तयारी

वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक भारतात येणार?; मलेशिया सरकारची प्रत्यार्पणाची तयारी

Next

नवी दिल्ली- वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू व इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) संस्थेचा संस्थापक झाकीर नाईक आज भारतात येणार आहे. मलेशिया सरकार झाकीर नाईकला भारताकडे सोपवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रक्षोभक भाषणे करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व अंमलबजावणी संचालनालया (ईडी)नं संयुक्तरीत्या कारवाई करण्याची झाकीर नाईकला भीती होती. त्यामुळेच तो परदेशात परागंदा झालाय.

अखेर मलेशिया सरकारनं झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. भादंवि कलम 153 (अ) व बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम 10, 13 व 18 अन्वये नाईकविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. ते गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेप होऊ शकते. समन्स काढूनही हजर न झाल्याने त्याला ‘फरार’ घोषित करण्यात आले आहे. मलेशियातून त्याचे प्रत्यार्पण करण्यात येणार आहे.


>‘पीस टीव्ही’वरून गरळ
ढाका या बांगलादेशच्या राजधानीतील एका उपाहारगृहात दोन वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केला. त्यात  22 जण ठार झाले होते. त्यातील आरोपींनी झाकीर नाईक याने त्याच्या ‘पीस टीव्ही’ वाहिनीवरील धर्मप्रचाराची भाषणे ऐकून आमची माथी भडकली, असे सांगितले. हाच धागा पकडून भारतात तपास करून ‘एनआयए’व ‘ईडी’ने नाईकविरुद्ध ही कारवाई केली आहे. ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या नाईकच्या स्वयंसेवी संघटनेसही बेकायदा घोषित करण्यात आले असून त्या संस्थेविरुद्ध 18 कोटी रुपयांचे ‘मनी लाँड्रिंग’ केल्याबद्दल ‘ईडी’ची कारवाई सुरू आहे.

Web Title: Controversial Preacher Zakir Naik To Return To India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.