...तर राहुल गांधींनी इटलीला निघून जावं; साक्षी महाराजांचं खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 07:31 PM2018-10-08T19:31:53+5:302018-10-08T19:33:43+5:30

उन्नवमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचं आव्हान

contest loksabha election from unnao bjp mp sakshi maharaj challenges rahul gandhi | ...तर राहुल गांधींनी इटलीला निघून जावं; साक्षी महाराजांचं खुलं आव्हान

...तर राहुल गांधींनी इटलीला निघून जावं; साक्षी महाराजांचं खुलं आव्हान

Next

लखनऊ: वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणारे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना खुलं आव्हान दिलं आहे. राहुल गांधींनी उन्नवमधून लोकसभा निवडणूक लढवावी, असं आव्हान साक्षी महाराज यांनी दिलं. राहुल गांधींनी माझ्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावी. यामध्ये जो कोणी पराभूत होईल, त्यानं राजकारण सोडावं, असं साक्षी महाराज म्हणाले. ते हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'सोबत बोलत होते.

साक्षी महाराज उत्तर प्रदेशातील उन्नव मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. याच मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवण्याचं आव्हान त्यांनी राहुल गांधींना दिलं आहे. 'राहुल गांधींनी माझ्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी. यामध्ये जो पराभूत होईल, त्यानं राजकारण सोडावं लागेल,' असं साक्षी महाराज म्हणाले. 'राहुल गांधींनी मला पराभूत केल्यास, मी राजकारणातून संन्यास घेईन आणि राहुल गांधींचा पराभव झाल्यास त्यांनी इटलीला निघून जावं,' असंदेखील त्यांनी म्हटलं. माझ्याविरोधात निवडणूक लढवल्यास राहुल यांचा पराभव निश्चित असेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. 

राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बेछूट आणि तथ्यहीन आरोप करत आहेत, असं साक्षी महाराज म्हणाले. 'पंडित नेहरुंनी फक्त चोरी केली, दरोडे टाकले. त्याशिवाय त्यांनी काहीच केलं नाही. त्यांना संपूर्ण देश उद्ध्वस्त केला. फाळणी झाल्यानंतर देशाला उद्ध्वस्त करण्यात नेहरु आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे,' अशी टीका साक्षी महाराजांनी केली. 
 

Web Title: contest loksabha election from unnao bjp mp sakshi maharaj challenges rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.