काँग्रेस इतका छोटा पक्ष कधीच बनला नव्हता! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:12 AM2018-03-04T00:12:06+5:302018-03-04T00:12:06+5:30

त्रिपुरातील भाजपचा नेत्रदीपक विजय म्हणजे आमच्या सरकारविरुद्ध पसरविण्यात आलेल्या ‘भीती, खोटेपणा व संभ्रम’ याला लोकांनी दिलेले चोख उत्तर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेस पक्ष आजच्याइतका छोटा कधीच नव्हता, असेही ते म्हणाले.

Congress never became such a small party! Prime Minister Narendra Modi | काँग्रेस इतका छोटा पक्ष कधीच बनला नव्हता! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टोला

काँग्रेस इतका छोटा पक्ष कधीच बनला नव्हता! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टोला

googlenewsNext

नवी दिल्ली : त्रिपुरातील भाजपचा नेत्रदीपक विजय म्हणजे आमच्या सरकारविरुद्ध पसरविण्यात आलेल्या ‘भीती, खोटेपणा व संभ्रम’ याला लोकांनी दिलेले चोख उत्तर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काँग्रेस पक्ष आजच्याइतका छोटा कधीच नव्हता, असेही ते म्हणाले.
ईशान्येकडील जनतेत तुटलेपणाची भावना होती. ती दूर करण्यासाठी आपल्या सरकारने ओव्हरटाइम केला आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, येथील एका राज्यातील प्रश्न सोडविण्याससाठी आधीच्या सरकारांमधील मंत्र्यांनी संपूर्ण कालखंडात जेवढा वेळ त्या राज्यांत घालविल्या त्यापेक्षा अधिक काळ आमच्या मंत्र्यांनी चार वर्षांत तेथे घालविला.
मोदींचे भाषण सुरू असताना जवळच्या मशिदीतून अजान सुरू झाली. त्यावेळी मोदी यांनी भाषण थांबविले. अजान संपल्यानंतरच त्यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली.

राहुल गांधी यांच्यावर हल्ला करताना ते म्हणाले की, काही लोक जन्मजात पदे घेऊनच वाढले. तथापि, त्यांची उंची छोटी होत गेली. याउलट अमित शाह पक्षाला अनेक राज्यांत विजयी करीत मोठे झाले. पुड्डुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना मी सांगितले की, तुम्ही भाग्यवान आहात. कारण जूनपर्यंत कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकारही जाणार आहे. त्यानंतर काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा एकमेव नमुना म्हणून तुम्हीच शिल्लक राहाल. पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग ‘स्वतंत्र फौजी’ आहेत. ते काँग्रेसला मोजत नाहीत व काँग्रेसही त्यांना मोजत नाही.

Web Title: Congress never became such a small party! Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.