काँग्रेसने १९ जागा गमावल्या, २५ कमावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 04:34 AM2019-05-26T04:34:27+5:302019-05-26T04:34:40+5:30

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ५२ जागांपर्यंत मजल मारली असली तरी २०१४ च्या १९ जागा पक्षाला गमवाव्या लागल्यात.

Congress lost 19 seats, earned 25 seats | काँग्रेसने १९ जागा गमावल्या, २५ कमावल्या

काँग्रेसने १९ जागा गमावल्या, २५ कमावल्या

Next

- असिफ कुरणे 

नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत ५२ जागांपर्यंत मजल मारली असली तरी २०१४ च्या १९ जागा पक्षाला गमवाव्या लागल्यात. नव्याने २५ जागा काँग्रेसने जिंकून घेतल्या आहेत. २०१४ च्या लाटेत जिंकलेल्या जागा राखण्यात यश आले असते तर काँग्रेसच्या जागा ७० वर पोहोचल्या असत्या.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्त मोदी लाट होती. त्याचा फटका काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांना बसला. काँग्रेसचे काही बालेकिल्ले गमवावे लागले. महाराष्ट्रातील नांदेड, हिंगोली या जागा काँग्रेसने गमावल्या. तर चंद्रपूरची जागा नव्याने जिंकली. तेलंगणामध्ये भोगीर ही जागा नव्याने पटकावली. त्याचप्रमाणे पुड्डेचेरी आणि अंदमान निकोबार येथील जागा परत मिळविण्यात काँग्रेसला यश आले. छत्तीसगडमध्ये कोरबा जागा नव्याने मिळविली. ओडिसामध्ये कोरापेट या जागेवरून सप्तगिरी उल्का विजयी झाले. कोस्मे फ्रान्सिस्को यांनी दक्षिण गोव्याची जागा भाजपकडून परत खेचून आणली. काँग्रेसला यावेळी मोलाची साथ दिली ती दक्षिणेतील केरळ, तमिळनाडू तर उत्तरेतील पंजाब राज्याने. केरळमध्ये गेल्यावेळी ८ जागा जिंकल्या होत्या. यावेळी १५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. पंजाबमधील ३ जागांवरून ८ जागांवर मजल गेली. तमिळनाडूमध्ये द्रमुकसोबत झालेल्या आघाडीचा फायदा काँग्रेस उमेदवारांना झाला. गेल्यावेळी एकही जागा नसणाऱ्या तमिळनाडूमध्ये यावेळी ८ जागांची लॉटरी लागली आहे. काही राज्यांत चांगली कामगिरी झाली असली तरी उत्तरेतील तीन राज्यांत सत्ता येऊनदेखील काँग्रेसला लोकसभेला पदरात काही पडले नाही. राजस्थान, गुजरातमध्ये पक्षाला खातेही उघडता आले नाही. तर सत्ता असलेल्या मध्य प्रदेशातील जागा दोनची एक झाली. येथे छिंदवाडाची जागा राखण्यात पक्षाला यश आले. तर गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला. सर्वांत मोठा फटका कर्नाटकात बसला असून, येथे जनता दल ( धर्मनिरपेक्ष ) सोबत सत्ता आहे. तरी पक्षाला आठ जागा गमवाव्या लागल्या. बंगलोरमधील एका जागेवर काँग्रेसला विजय मिळाला. बिहारमधील तारीक अन्वर यांची जागा पक्षाला गमवावी लागली. ईशान्येकडील राज्यातील चार जागा हातातून निसटल्या.
>उत्तर प्रदेशातील पारंपरिक बालेकिल्ला असणाºया अमेठीमधून राहुल गांधी यांना, तर हरियाणातील रोहतकमधून दिपेंदर हुड्डा यांना पराभव स्वीकारावा लागला. २०१४ च्या पारंपरिक जागा हरल्यामुळे काँग्रेसला १९ जागांचा फटका बसला. या जागा जिंकण्याची शक्यता जास्त असताना पराभव स्वीकारावा लागला.

Web Title: Congress lost 19 seats, earned 25 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.