घरातून अपहरण करत तरुणीवर सामूहिक बलात्कार, ठरलेलं लग्न मोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 10:03 PM2017-12-02T22:03:34+5:302017-12-02T22:11:43+5:30

तरुणीचं घरातून अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय तरुणीवर लालरु येथे सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिघांनी मिळून तरुणीवर बलात्कार केला होता.

College student kidnapped from house and gangraped | घरातून अपहरण करत तरुणीवर सामूहिक बलात्कार, ठरलेलं लग्न मोडलं

घरातून अपहरण करत तरुणीवर सामूहिक बलात्कार, ठरलेलं लग्न मोडलं

Next
ठळक मुद्देतरुणीचं घरातून अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटनाअखेर 17 दिवसानंतर ही घटना उघडकीस आली तरुणीने गाडीचा नंबर दिल्याने पोलिसांना आरोपींची ओळख पटवण्यास मदत मिळाली आहे

मोहाली - तरुणीचं घरातून अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय तरुणीवर लालरु येथे सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिघांनी मिळून तरुणीवर बलात्कार केला होता. 13 नोव्हेंबरला ही घटना घडली होती, पण भीतीपोटी तरुणीने पोलिसांत तक्रार केली नव्हती. अखेर 17 दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे. 

आरोपींना तरुणीला इतकं धमकावलं होतं की, आपल्या कुटुंबाला सांगायलाही ती घाबरत होती. कुटुंबियांनी विश्वासात घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यांनी तिने आपल्यावर झालेल्या बलात्काराची माहिती दिली. आपण घरात एकटे असताना, तिघा आरोपींनी मिळून आपलं अपहरण केल्याचं तिने सांगितलं. पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिघे आरोपी तोंडावर मास्क लावून आले होते. आधी त्यांनी दरवाजा ठोठावला आणि नंतर जबरदस्ती करत घरात घुसले. त्यांनी तरुणीला ओढत घराबाहेर पार्क असलेल्या कारमध्ये नेलं आणि एक कपडा तिच्या तोंडाला बांधला ज्यानंतर ती बेशुद्द पडली.

तरुणी शुद्धीत आली तेव्हा ती एका रुममध्ये होती. यानंतर तिघांनी मिळून तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. 15 नोव्हेंबरला आरोपींनी तरुणीचे डोळे बांधले आणि कुरली गावात सोडलं. तिथे एका व्यक्तीने पीडित तरुणीला लालरु येथे पोहचण्यास मदत केली. आरोपींच्या गाडीचा नंबर तरुणीच्या लक्षात असून तिने तो पोलिसांना दिला आहे. 

तरुणीने गाडीचा नंबर दिल्याने पोलिसांना आरोपींची ओळख पटवण्यास मदत मिळाली आहे. गुरुसेवक सिंह, गुरजिंदर सिंह आणि परमिंदर सिंह अशी आरोपींची नावे असून, पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार आहेत.  

19 नोव्हेंबरला तरुणीचं लग्न होणार होतं. पण या घटनेनंतर हे लग्न रद्द करण्यात आलं आहे. 'आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत. तिघे आरोपी त्यात गावातले असल्याने पीडित तरुणीला ओळखत असण्याची शक्यता आहे. ते जास्त वेळ लपून राहू शकणार नाहीत', असं पोलीस अधिका-याने सांगितलं आहे. 
 

Web Title: College student kidnapped from house and gangraped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.