दिल्ली दंगलीत जीव गमावलेल्या अंकित शर्माच्या भावाला सरकारी नोकरी, कुटुंबीयांना 1 कोटींची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 03:38 PM2022-03-17T15:38:05+5:302022-03-17T15:39:28+5:30

Delhi Riots : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी अंकित शर्माच्या कुटुंबाला सरकारी नोकरीचे प्रमाणपत्र दिले. 

cm arvind kejriwal handover one crore rs cheque and gave govt job to ankit sharma brother died in delhi riots | दिल्ली दंगलीत जीव गमावलेल्या अंकित शर्माच्या भावाला सरकारी नोकरी, कुटुंबीयांना 1 कोटींची मदत

दिल्ली दंगलीत जीव गमावलेल्या अंकित शर्माच्या भावाला सरकारी नोकरी, कुटुंबीयांना 1 कोटींची मदत

Next

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीत जीव गमावलेल्या आयबी कर्मचाऱ्याच्या भावाला केजरीवाल सरकारने सरकारी नोकरी दिली आहे. दिल्ली दंगलीदरम्यान अंकित शर्माची हत्या झाली होती. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी अंकित शर्माच्या कुटुंबाला सरकारी नोकरीचे प्रमाणपत्र दिले. 

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "माणसाची कमतरता कधीच पूर्ण होऊ शकत नाही, पण या सरकारी नोकरीमुळे आणि 1 कोटींच्या मदतीमुळे कुटुंबाला बळ मिळेल. भविष्यातही कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू."

फेब्रुवारी 2020 मध्ये उत्तर-पूर्व दिल्लीत दंगल उसळली होती, ज्यामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. आयबी कर्मचारी अंकित शर्माचा 26 फेब्रुवारी रोजी चांदबाग भागातील त्यांच्या घराजवळील नाल्यात सापडला होता.

दुसरीकडे, दिल्ली दंगलीच्या कट प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर बुधवारी (16 मार्च) संध्याकाळी काँग्रेसच्या माजी नगरसेवक इशरत जहाँची तिहार तुरुंगातून सुटका करण्यात आली. एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले की, इशरत जहाँची बुधवारी संध्याकाळी 7.5 वाजता तुरुंगातून सुटका करण्यात आली.  

दिल्ली दंगलीच्या मोठ्या कटाशी संबंधित प्रकरणात दिल्ली न्यायालयाने सोमवारी इशरत जहाँला जामीन मंजूर केला होता. इशरत जहाँ आणि अन्य लोकांवर उत्तर-पूर्व दिल्लीत फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दंगलीचा मुख्य सूत्रधार म्हणून भूमिका बजावल्याच्या आरोपात यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: cm arvind kejriwal handover one crore rs cheque and gave govt job to ankit sharma brother died in delhi riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.