हॉटेलमध्ये बिर्याणीवरून राडा, वकिलाला बंदुकीच्या धाकावर मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 02:14 PM2017-11-02T14:14:56+5:302017-11-02T14:20:07+5:30

हॉटेलमध्ये बिर्याणी कोणाला पहिली मिळणार यावरून शाब्दिक वाद सुरू झाला होता.

Clash over who gets biryani first | हॉटेलमध्ये बिर्याणीवरून राडा, वकिलाला बंदुकीच्या धाकावर मारहाण

हॉटेलमध्ये बिर्याणीवरून राडा, वकिलाला बंदुकीच्या धाकावर मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देहॉटेलमध्ये बिर्याणी कोणाला पहिली मिळणार यावरून शाब्दिक वाद सुरू झाला होता. शाब्दिक वादाने काही वेळातच वेगळ रूप घेतलं.

लखनऊ- हॉटेलमध्ये ऑर्डर केल्यानंतर आपली ऑर्डर येईपर्यंत बराचवेळ वाट पाहावी लागते. कधीकधी दुसरा ग्राहक नंतर येऊनही त्याची ऑर्डर आधी दिल्याने किरकोळ वादही होतात. लखनऊमध्येही तसाच प्रकार घडला आहे. पण तेथे सुरू झालेला वाद काही वेळाने विकोपाला गेला. हॉटेलमध्ये बिर्याणी कोणाला पहिली मिळणार यावरून शाब्दिक वाद सुरू झाला होता. त्या शाब्दिक वादाने काही वेळातच वेगळ रूप घेतलं. लखनऊमधील एका हॉटेल मालकाने व त्याच्या सहकाऱ्याने हॉटेलमध्ये आलेल्या वकिलाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली. लखनऊमधील पत्रकार संघाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये बुधवारी हा प्रकार घडला. 

वकील सत्यव्रत आणि त्यांचा मित्र सतेद्रा सिंह बुधवारी दुपारी पत्रकार संघाच्या जवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये गेले होते. तेथे त्यांनी बिर्याणी ऑर्डर केली. त्यादरम्यान, काही लोक तेथे आली आणि त्यांच्या बाजूच्याच टेबलावर बसली. दहा मिनिटांनंतर हॉटेलमधील वेटर दोन प्लेट बिर्याणी आणून त्याने ती त्या अज्ञात लोकांना दिली,अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

हॉटेलमध्ये नंतर आलेल्यांना आधी ऑर्डर दिल्याने वकीला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला हटकलं. त्यानंतर सिंग आणि त्या वेटरमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद  पाहून हॉटेल मॅनजेरन उत्तम यांनी मध्ये हत्सक्षेप करत सिंग यांना ढकललं. तसंच पोलिसांमध्ये तक्रार करायची धमकी दिली. त्यानंतर मला आणि माझ्या सहकाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करण्यात आली, असं सिंग यांनी पोलिसांना सांगितलं आहे. 

दरम्यान, हॉटेल मॅनेजरविरूद्धात हत्येचा प्रयत्न, शांतता भंग, वादावादी आणि प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानंतर त्याला अटक केली जाईल, अशी महितील पोलीस अधिकारी डीके उपाध्याय यांनी दिली आहे. 
 

Web Title: Clash over who gets biryani first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा