कठीण आहे 'महाराजा'... एअर इंडियाचं टॉयलेट ओव्हर फ्लो, विमानात शिरलं घाण पाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 11:13 AM2019-02-14T11:13:26+5:302019-02-14T12:06:20+5:30

एअर इंडियाच्या लंडनहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानातील प्रवाशांना टॉयलेटमुळे मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे.

choked toilet overflows on flight from uk | कठीण आहे 'महाराजा'... एअर इंडियाचं टॉयलेट ओव्हर फ्लो, विमानात शिरलं घाण पाणी!

कठीण आहे 'महाराजा'... एअर इंडियाचं टॉयलेट ओव्हर फ्लो, विमानात शिरलं घाण पाणी!

Next
ठळक मुद्देएअर इंडियाच्या लंडनहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानातील प्रवाशांना टॉयलेटमुळे मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे.व्हीटी-एएनएन या विमानाने आकाशात झेप घेतल्यावर टॉयलेटमधील घाण पाणी अचानक इकॉनोमी क्लासच्या लॉबीमध्ये शिरल्याची घटना घडली.घाण पाण्यामुळे विमात सर्वत्र दुर्गंधी पसरली. काही प्रवाशांनी याबाबत तातडीने तक्रार केली.

नवी दिल्ली - एअर इंडियाच्या लंडनहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानातील प्रवाशांना टॉयलेटमुळे मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे. व्हीटी-एएनएन या विमानाने आकाशात झेप घेतल्यावर टॉयलेटमधील घाण पाणी अचानक इकॉनोमी क्लासच्या लॉबीमध्ये शिरल्याची घटना घडली. या घटनेनंतर विमान व्यवस्थापनाने तातडीने प्रवाशांना विमानाच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये शिफ्ट केलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील टॉयलेटमधील एका पाईपमध्ये एक छोटा टॉवेल अडकल्यामुळे तो पाईप बंद झाला होता. यामुळे पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा झाला नाही. टॉयलेट ओव्हरफ्लो झाले आणि घाण पाणी लॉबीमध्ये शिरण्यास सुरुवात झाली. घाण पाण्यामुळे विमात सर्वत्र दुर्गंधी पसरली. काही प्रवाशांनी याबाबत तातडीने तक्रार केली. त्यानंतर इकॉनॉमी क्लासच्या लॉबीतील प्रवाशांना इतर ठिकाणी हलवण्यात आले. 

विमानात दुर्गंध पसरू नये म्हणून सर्वत्र सुगंधी अत्तर मारण्यात आले. विमानातील प्रवाशांना टॉयलेटमधील पाईपमध्ये पेपर अथवा टॉवेल टाकू नये याचा सल्ला दिला जातो. मात्र टॉयलेटचा नीट वापर न झाल्यायामुळे ही समस्या निर्माण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. एअर इंडियाचं टॉयलेट ओव्हर फ्लो झाल्यामुळे दिल्लीपर्यंत प्रवाशांना त्रासाला सामोरं जावं लागलं. 

काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या भोपाळ-मुंबई या विमानातील एका प्रवाशाच्या नाश्त्यामध्ये  झुरळ आढळल्याची घटना समोर आली होती. या घटनेची दखल एअर इंडियाने घेतली असून जाहीर माफी मागितली होती. प्रवाशाला खाद्यपदार्थामध्ये झुरळ सापडल्यामुळे एअर इंडियाने याबाबत जाहीर माफी मागणार एक ट्वीट केलं होतं. 'भोपाळ- मुंबई विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना आलेल्या वाईट अनुभवाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. प्रवाशांना प्रवासाचा आनंद मिळावा हाच आमचा सर्वतोपरी हेतू असतो', असं एअर इंडियाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. 

Web Title: choked toilet overflows on flight from uk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.