अण्णांच्या मागण्यांसंदर्भात सरकार प्रस्ताव घेऊन जाणार, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीसाठी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 06:11 PM2018-03-27T18:11:29+5:302018-03-27T18:11:29+5:30

अण्णा हजारे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. परंतु त्यांच्या उपोषणाची सरकारकडून अद्याप म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाही.

Chief Minister Fadnavis sends for Delhi government proposals regarding the demands of Anna Hazare | अण्णांच्या मागण्यांसंदर्भात सरकार प्रस्ताव घेऊन जाणार, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीसाठी रवाना

अण्णांच्या मागण्यांसंदर्भात सरकार प्रस्ताव घेऊन जाणार, मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीसाठी रवाना

Next

नवी दिल्ली- अण्णा हजारे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. परंतु त्यांच्या उपोषणाची सरकारकडून अद्याप म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाही. उशिरा का होईना सरकारला जाग आली असून, अण्णांच्या मागण्यांसंदर्भात सरकार प्रस्ताव घेऊन जाणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

सरकारकडून आता अण्णांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात अण्णांना भेटणार असून, त्यांच्या मागण्यांसंदर्भात प्रस्ताव देणार आहेत. प्रस्ताव पाहून अण्णा रात्री आठ वाजता उपोषणासंदर्भात निर्णय घेणार आहेत.

 सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असं विधान अण्णा हजारेंनी केलं आहे. गेल्या पाच दिवसांपासून अण्णा उपोषणाला बसले आहे. या उपोषणामुळे अण्णांचं जवळपास पाच किलो वजन घटलं आहे. सरकारकडून अद्यापही आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं अण्णा हजारे नाराज आहेत. सरकारकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा निर्धारही अण्णांनी बोलून दाखवला आहे.

आमच्या 11 मागण्या अद्यापही मान्य करण्यात आलेल्या नाहीत. 11 मागण्यांपैकी कमीत कमी चार मागण्या तरी मान्य करा. तसेच उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्हाला कालावधी निश्चित करून द्या, असंही अण्णा म्हणाले आहेत. अनेक नेते येऊन भेटत असून, आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असंही अण्णांनी स्पष्ट केलं आहे. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे म्हणून सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. 

Web Title: Chief Minister Fadnavis sends for Delhi government proposals regarding the demands of Anna Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.