चंद्रशेखर 'आझाद' यांच्या त्या दोन इच्छा राहिल्या अपूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 02:05 PM2018-07-23T14:05:31+5:302018-07-23T14:06:11+5:30

चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानानंतर काही वर्षांना भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण जीवनाच्या अखेरपर्यंत ब्रिटिशांच्या हाती न लागलेल्या आझाद यांच्या दोन इच्छा मात्र अपूर्णच राहिल्या. 

Chandrasekhar 'Azad' had two wishes remained incomplete | चंद्रशेखर 'आझाद' यांच्या त्या दोन इच्छा राहिल्या अपूर्ण 

चंद्रशेखर 'आझाद' यांच्या त्या दोन इच्छा राहिल्या अपूर्ण 

नवी दिल्ली -  भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करणाऱ्या क्रांतिकारकांपैकी एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व  असलेल्या चंद्रशेखर आझाद यांची आज जयंती. बालपणी अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य लढयात सहभागी झालेल्या आझाद यांनी तरुणपणी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लझा उभारला होता. देशाला स्वातंत्र मिळावे ही आझाद यांची इच्छा होती. आझाद यांच्या बलिदानानंतर काही वर्षांना भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण जीवनाच्या अखेरपर्यंत ब्रिटिशांच्या हाती न लागलेल्या आझाद यांच्या दोन इच्छा मात्र अपूर्णच राहिल्या. 

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रशियाचा सर्वेसर्वा असलेल्या स्टॅलिन यांना भेटण्याची चंद्रशेखर आझाद यांची इच्छा होती. स्टॅलिन यांनी आपणास भेटीचे निमंत्रण दिले आहे, असे ते सांगत असत. पण रशियात जाण्यासाठी 1200 रुपये त्यांच्याकडे नव्हते. त्या काळी 1200 ही खूप मोठी रक्कम होती. मात्र एवढ्या रकमेची तरतूद करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

थोर क्रांतिकारक भगत सिंग हे चंद्रशेखर आझाद यांचे मित्र होते. भगत सिंग यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी टाळण्यासाठी आझाद यांनी जंग जंग पछाडले. अनेकांच्या भेटी घेतल्या. मात्र भगत सिंग यांची फाशी टाळणे त्यांना शक्य झाले नाही. आझाद यांच्या मृत्युनंतर महिनाभरातच भगत सिंग यांना सुखदेव आणि राजगुरू यांच्यासह फाशी देण्यात आली.  

Web Title: Chandrasekhar 'Azad' had two wishes remained incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.