चंद्राबाबू-ममता बॅनर्जींमध्ये महाआघाडीबाबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 05:09 AM2019-05-11T05:09:51+5:302019-05-11T05:11:36+5:30

लोकसभा निवडणुकांत भाजप व मित्रपक्षांना बहुमत न मिळाल्यास विरोधी पक्षांनी घेण्याच्या भूमिकेविषयी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चर्चा केली.

 Chandrababu-Mamta Banerjee discussions about the Mahaaaghadi | चंद्राबाबू-ममता बॅनर्जींमध्ये महाआघाडीबाबत चर्चा

चंद्राबाबू-ममता बॅनर्जींमध्ये महाआघाडीबाबत चर्चा

Next

कोलकाता  - लोकसभा निवडणुकांत भाजप व मित्रपक्षांना बहुमत न मिळाल्यास विरोधी पक्षांनी घेण्याच्या भूमिकेविषयी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चर्चा केली. निवडणूक निकालानंतर काय भूमिका घ्यायची यावर त्यांनी विचारमंथन केल्याचे तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

चंद्राबाबूंनी बुधवारी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. त्याची माहितीही नायडू यांनी ममता बॅनर्जी यांना दिली. विरोधी पक्षांची दिल्लीमध्ये २१ मे रोजी बैठक आहे. त्याला ममता बॅनर्जी हजर राहणार का या प्रश्नावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने सांगितले की, बैठकीची तारीख अजून ठरलेली नाही. लोकसभा निवडणुकांचा २३ मे रोजी निकाल लागल्यानंतर ही बैठक होण्याची शक्यता असून ममता बॅनर्जी त्याला उपस्थित राहू शकतात. (वृत्तसंस्था)

ममतांची प्रशंसा

खरगपूर येथील तृणमूलच्या जाहीर सभेत चंद्राबाबू नायडू यांनी ममता बॅनर्जी यांची प्रशंसा केली होती. भाजपला हटविण्यासाठी निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये तृणमूललाच मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. नंतर चंद्राबाबू नायडू उत्तर कोलकाता लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार सुदीप बंडोपाध्याय यांच्या प्रचारयात्रेतही सामील झाले होते.

Web Title:  Chandrababu-Mamta Banerjee discussions about the Mahaaaghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.