'पद्मावती' चित्रपट मीडियाला आधी दाखवल्यामुळे सेन्सॉर बोर्ड निर्मात्यांवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 04:15 PM2017-11-18T16:15:37+5:302017-11-18T16:18:34+5:30

इतिहासाशी छेडछाड केल्याच्या आरोपामुळे आधीच वादात सापडलेल्या 'पद्मावती' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गात आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

 Censor Board angry over producers 'Padmavati' due to media release | 'पद्मावती' चित्रपट मीडियाला आधी दाखवल्यामुळे सेन्सॉर बोर्ड निर्मात्यांवर नाराज

'पद्मावती' चित्रपट मीडियाला आधी दाखवल्यामुळे सेन्सॉर बोर्ड निर्मात्यांवर नाराज

googlenewsNext
ठळक मुद्देबोर्डाकडून प्रमाणपत्र घेण्याआधी मीडियासाठी चित्रपटाचे खास स्क्रिनिंग ठेवले त्यानंतर राष्ट्रीय वाहिन्यांवर या चित्रपटाची समीक्षा सुरु आहे. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे स्वत: निर्मात्यांनी मान्य केले होते.

मुंबई - इतिहासाशी छेडछाड केल्याच्या आरोपामुळे आधीच वादात सापडलेल्या 'पद्मावती' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गात आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत. सेन्सॉर बोर्डाला चित्रपट दाखवण्याआधी पत्रकारांसाठी 'पद्मावती' चित्रपटाचा विशेष खेळ ठेवण्याचा निर्मात्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाला अजिबात पटलेला नाही. सेन्सॉर बोर्डाचे सदस्य नाराज झाले असून बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशी यांनी स्पष्टपणे आपली नाराजी बोलून दाखवली. सेन्सॉर बोर्डाआधी मीडियाला चित्रपट दाखवून  निर्मात्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे असे प्रसून जोशी म्हणाले. 

बोर्डाकडून प्रमाणपत्र घेण्याआधी मीडियासाठी चित्रपटाचे खास स्क्रिनिंग ठेवले त्यानंतर राष्ट्रीय वाहिन्यांवर या चित्रपटाची समीक्षा सुरु आहे. हे निराशाजनक आहे असे प्रसून जोशी एएनआयशी बोलताना म्हणाले. चित्रपटाला मंजुरी मिळावी यासाठी चित्रपटाचे निर्माते सेन्सॉर बोर्डावर दबाव आणत आहेत असे त्यांनी सांगितले. सेन्सॉरच्या प्रक्रियेला कमी लेखून संधीसाधूपणाचे हे एक उदहारण आहे असे जोशी म्हणाले.

पद्मावतीच्या रिव्यूसाठी या आठवडयात निर्मात्यांकडून अर्ज मिळाला. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे स्वत: निर्मात्यांनी मान्य केले होते. चित्रपट काल्पनिक आहे कि, ऐतिहासिक त्याचे डिसक्लेमरही टाकण्यात आले नव्हते. कागदपत्रे मागितल्यानंतर बोर्डावर उलटा आरोप करणे चुकीचे आहे असे प्रसून जोशी म्हणाले. सध्या देशभरात पद्मावती चित्रपटाविरोधात जोरदार निदर्शने सुरु आहेत.



 

चित्तोडगड किल्ल्यात प्रवेशबंदी
दरम्यान पद्मावती सिनेमाच्या विरोधात शुक्रवारी (17 नोव्हेंबर) चित्तोडगड किल्ल्याच्या बाहेर घोषणाबाजी तसेच प्रवेशबंदी रण्यात आली.  सिनेमामध्ये ऐतिहासिक तथ्यामध्ये काही बदल करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.  



 

भन्साळींचे शीर कापून आणा, पाच कोटी मिळवा; राजपूत नेत्याकडून घोषणा
उत्तरप्रदेशच्या मेरठमधील एका राजपूत नेत्याने अशी घोषणा केली की, जो व्यक्ती पद्मावती चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीली भन्साळी यांचे शीर कापून आणेल, त्याला 5 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.



 

'पद्मावतीचं तिकीट काढण्याआधी विमा काढून ठेवा'
 राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये चित्रपटाविरोधात सर्वात जास्त रोष पहायला मिळत आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशातील एका राजपूत नेत्याने संजय लिला भन्साळी यांचं शिर कापणा-याला पाच कोटींचं बक्षिस जाहीर केलं होतं. दरम्यान आता मध्य प्रदेशातील एका राजपूत संघटनेने पद्मावती पहायला जाणा-या प्रेक्षकांना आपला विमा काढून ठेवण्याची धमकी दिली आहे. 
 

Web Title:  Censor Board angry over producers 'Padmavati' due to media release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.